अशोक गुरव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दिंडेवाडी येथे “एक काठी आधाराची ” उपक्रम

अशोक गुरव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दिंडेवाडी येथे
“एक काठी आधाराची ” उपक्रम
सिंहवाणी ब्युरो / पिंपळगाव
दिंडेवाडी, ता. भुदरगड येथील सामाजिक कार्यकर्ते व संजय गांधी निराधार समिती सदस्य अशोक गोविंद गुरव यांच्या वाढदिवसाच्या निमित्त “एक काठी आधाराची ” हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.. यामध्ये 40 ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ देण्यात आला.. गेली 15 वर्षे सामाजिक कार्य करणारे अशोक गुरव हे नेहमी रंजल्या गांजल्या साठी कार्य करत असतात. 20% राजकारण आणि 80% समाजकारण हे त्यांच्या कामाचे सूत्र आहे..यापूर्वी त्यांनी आपल्या उपसरपंच पदाचे मानधन गावातील विधवा महिलांचा घरफळा भरण्यास देऊन आदर्श निर्माण केला होता.संजय गांधी निराधार समिती सदस्य असताना त्यांनी गावातील 70 व भागातील 1000 हुन अधिक लोकांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला.. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच बाळासाहेब शिंदे, उपसरपंच किरण लोहार, सदस्य शामराव रामाणे, भिकाजीं मगदूम, गणेश मोरबाळे, अशोक मोरबाळे,लक्ष्मण भोईटे, अभियंता ऋतुराज भोईटे, तेजस भोईटे, सुनील ढेकळे, सुमित कुरळे, धनाजी ढेकळे, संदीप फराकटे व 40 ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते