कुर ता. भुदरगड इथंल्या विवाहितेचा मृत्यू घातपातीच – मृत्यूस कारणीभूत पती, दीर, सासू यांच्यावर कठोर कारवाई करा : ग्रामस्थांची मागणी ग्रामस्थाचा कॅण्डल मार्च : गाव हळहळला.

कुर ता. भुदरगड इथंल्या विवाहितेचा मृत्यू घातपातीच –
मृत्यूस कारणीभूत पती, दीर, सासू यांच्यावर कठोर कारवाई करा : ग्रामस्थांची मागणी
ग्रामस्थाचा कॅण्डल मार्च : गाव हळहळला.
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी:-
भुदरगड तालुक्यातील कुर इथंली माया विठ्ठल सारंग वय २९ या विवाहितेचा मृत्यू हा घातपात असुन तिच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पती विठ्ठल पांडुरंग सारंग दिर सुरेश पांडुरंग सारंग, सासु सरस्वती पांडुरंग सारंग या कुटुंबियांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कुर ग्रामस्थांच्या वतीने गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी महिलांसह ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
भुदरगड तालुक्यातील कुर इथंली अंगणवाडी सेविका सौ, माया विठ्ठल सारंग वय २९यांचा शनिवारी ( ११) रोजी सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान चक्कर येऊन पडल्याचे मायाच्या सासर कडून माहेरच्या नातेवाईकाना सांगितल्याने यावेळी माहेरच्या मंडळींनी चौकशी केली असता तिला उपजिल्हा रुग्णालय गारगोटी इथं दाखल केल्याच समजल्यावर नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली असता डॉक्टरांनी ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचं सांगितलं त्यामुळं नातेवाईकना हा मृत्यू संशयास्पद वाटला, नातेवाईकांनी मृतदेह उघडून पाहताच तिच्या गळ्याला दोरीच व्रण आढळले त्यामुळे मायाचा मृत्यू हा घातपात असल्याचे लक्षात येताच तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी तिचा मृतदेह सीपीआर रुग्णालयात शव विच्छेदणासाठी पाठवण्यात आला. तिचा मृत्यू हा घातपात असून तीच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पती, दीर, सासू यांचेवर कठोर कारवाई व्हावी यासाठी अवघा गाव हळहळला व गावातून कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी मयत माया हिला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मयत माया सारंगची बहीण अश्विनी पालकर यांनी मायाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पती, दीर, सासू यांचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली तर भावजय साधना दत्तात्रय पाटील यांनी माझ्या नणंदेस पती, दीर, सासू हे खुण करण्यास कारणीभूत असून त्यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ, महिला, युवती यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या व कारवाईची मागणी केली.
मयत माया सारंग हिच्या गावातील माहेरच्या घरापासून कॅण्डल मोर्चा गावातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आला. मयत मायाच्या दोन लहान मुली व कुटुंबियांचा आक्रोश पाहून गाव हळहळला. यावेळी पती, दीर, सासू यांच्या अटकेची मागणी केली.