कागल येथे ना. मुश्रीफ यांच्या हस्ते सैनिक हॉलचे उद्घाटन : आजी-माजी सैनिकांनी उपस्थित रहावे- कर्नल सुळकुडे

कागल येथे ना. मुश्रीफ यांच्या हस्ते सैनिक हॉलचे उद्घाटन
आजी-माजी सैनिकांनी उपस्थित रहावे- कर्नल सुळकुडे
सिंहवाणी ब्युरो / कागल
कागल नगरपरिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या सैनिक भावनासमोरील हॉलचा सैनिक अर्पण सोहळा रविवार दिनांक 19 रोजी कागल येथे संपन्न होत आहे. हा समारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेजर जनरल एन एन काशीद हे उपस्थित राहणार आहेत. या समारंभात सर्व आजी माजी सैनिकांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक कर्नल विलास सुळकुडे, संस्थापक अध्यक्ष, आजी-माजी सैनिक समाजसेवी असोसिएशन कागल यांनी केले आहे.
कागल येथील श्रीमंत जयसिंगराव पार्क येथे सैनिक भावनासमोर हा भव्य हॉल बांधण्यात आला आहे. या समारंभास कमांडंट राजाराम शिंदे, कर्नल एस एस वराडकर, कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल शिवराज पाटील, कॅप्टन एन बी पाटील, कॅप्टन पी डी घोरपडे, ग्रुप कॅप्टन एस शिराळकर, विंग कमांडर एस जे पाटील व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, डॉक्टर प्रकाश ओसवाल, सुभेदार सुभाष डोंगरे, मारुती नवले आदी उपस्थित राहणार आहेत, सदर कार्यक्रम सायंकाळी तीन वाजता कार्यस्थळावर होत आहे.
