सुशीलादेवी साळुंखे महिला बी.एड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*

सुशीलादेवी साळुंखे महिला बी.एड महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा*
सिंहवाणी ब्युरो / तासगाव :
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव येथे “वाचन प्रेरणा दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, पुस्तकांप्रती आदर आणि ज्ञानार्जनाची प्रेरणा जागविणे हा हेतू ठेवण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एम पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रशिक्षणार्थीनीनी तयार केलेल्या भित्तीपत्रिकेचे अनावरण करून करण्यात आले. तसेच प्रशिक्षणार्थींनीनी वाचूया आनंदे या उपक्रमाचे उद्घाटन केले. प्रशिक्षणार्थींनी मनोगतामध्ये ललिता बामणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डॉ. अर्चना चिखलीकर यांनी सांगितले की, “डॉ. अब्दुल कलाम हे विद्यार्थ्यांसाठी सदैव प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व राहिले आहेत. त्यांनी आपल्या ज्ञान, शिस्त आणि अथक प्रयत्नांच्या बळावर देशाला विज्ञान क्षेत्रात नवे शिखर गाठून दिले. त्यांचे विचार आणि जीवनचरित्र प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावे आणि आत्मसात करावे.” तसेच डॉ देवदत्त खजुरकर व प्रा प्रमोद शेंडगे यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचनाचे महत्त्व सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम.पाटील यांनी “वाचनाचे महत्त्व आणि डॉ. कलाम यांचे विचार” या विषयावर आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. त्यांनी प्रशिक्षणार्थीनींना सांगितले की वाचन ही फक्त सवय नसून ती एक जीवनशैली आहे. वाचनामुळे व्यक्तीचा दृष्टिकोन, विचारसरणी आणि आचारधर्म घडतो. त्यांनी “Dream, Read and Achieve” या डॉ. कलाम यांच्या मंत्राचे महत्त्व स्पष्ट केले. ग्रंथालयातील नवीन पुस्तके आणि संदर्भ साहित्य यांची माहिती दिली तसेच प्रशिक्षणार्थिनींनी दररोज किमान ३० मिनिटे वाचन करण्याची सवय लावावी, असे मत प्रतिपादित केले केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. लक्ष्मी भंडारे ,डॉ. देवदत्त खजुरकर ,डॉ .अर्चना चिखलीकर, प्रा.अंकुश पंडित, व सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. प्रमोद शेंडगे यांनी केले. तसेच प्रशासकीय कर्मचारी श्री संजय कुंभार,हणमंत वाघमारे,सुजाता हजारे,अस्मिता साळी,बी.एड भाग एक व दोन मधील प्रशिक्षणार्थींनीनी प्रयत्न केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक्षा गिड्डे यांनी केले.सूत्रसंचालन पूर्वा गायकवाड व प्रियांका गवळी केले, तर आभार भाग्यश्री धाबुगडे यांनी केले.