देवचंद महाविद्यालयात सायबर सुरक्षेबाबत नाटक, रॅप व कवितांद्वारे जनजागृती

देवचंद महाविद्यालयात सायबर सुरक्षेबाबत नाटक, रॅप व कवितांद्वारे जनजागृती
सिंहवाणी ब्युरो / निपाणी
देवचंद कॉलेजच्या संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सायबर गुन्हे व सुरक्षितता याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये बोलताना प्रा. प्रशांत कुंभार यांनी देवचंद कॉलेज, अर्जुननगर व क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा : या उपक्रमाची माहिती दिली. तर महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे यांनी या कार्यक्रमामध्ये बोलताना सायबर गुन्ह्यामुळे निर्माण होणारे धोके व त्यापासून सावध रहाणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सायबर वॉरियर्स क्लबचा मीडिया डायरेक्टर
कु. आलोक कांबळे, सेक्रेटरी कु.श्रावणी पवार, कु.आकांक्षा आरडे, कु. प्रतीक इंदलकर यांनी विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक आणि ऑनलाईन लिंकद्वारे होणारे फ्रॉड याबद्दलची माहिती नाटकाद्वारे सादर केली.
तर कु. रुद्र सुतार, कु. निशांत जाधव आणि कु. प्रतीक इंदलकर यांनी स्वतः लिहिलेल्या कविता व रॅप मार्फत सायबर जनजागृती केली. तसेच
कु. हर्षदा पाटील, कु. मधुरा पुंडे, कु. आलोक कांबळे, कु. स्वाती तांबेकर, कु. प्रतीक्षा नाईक , कु. ज्योती हिरुगडे, कु. सलोनी जबडे, कु. प्रतिक्षा पेडणेकर, कु. प्राजक्त खवरे या सर्व वॉरियर्सनी मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम, विद्यार्थी व सामान्य लोकांची होणारी फसवणूक, ऑनलाईन आर्थिक व्यवहारातून होणारी फसवणूक, याबद्दलची माहिती सांगून अशी कोणती घटना घडली तर त्याची तक्रार कोठे व कशी करावी याबद्दलचे मार्गदर्शन केले.
कु. वेदिका घाटगे हिने सायबर सेफ प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता केली, तर सायबर वॉरियर क्लबची सेक्रेटरी कु. श्रावणी पवार हिने उपस्थितांचे व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या उपक्रमासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिषभाई शाह, उपाध्यक्षा तृप्तीभभी शाह यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या एस. पी. जाधव, पर्यवेक्षक श्री. ए. एस. डोनर व एन. सी. सी. केअरटेकर श्री. निरंजन जाधव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.