गडहिंग्लजच्या वैभवात हॉटेल आर. के. इन भर टाकेल : – ना. मुश्रीफ

गडहिंग्लजच्या वैभवात हॉटेल आर. के. इन भर टाकेल : – ना. मुश्रीफ
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज:
आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र , कर्नाटक राज्यातील पर्यटक मोठया संख्येने गडहिंग्लज शहरातून जाणाऱ्या नवीन हायवेद्वारे गोवा आणि कोकणात जातात. पर्यटनाच्या नकाशावर गडहिंग्लजचे नाव अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देत रामकमल हॉटेल( आर. के. ईन) पर्यटन क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करेल असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथे व्यक्त केला. यावेळी ना मुश्रीफ यांच्या हस्ते नामदार थाळीचा शुभारंभ देखील करण्यात आला.
येथील हॉटेल आर. के. ईन या तारांकित हॉटेलच्या शुभारंभ प्रसंगी ना मुश्रीफ बोलत होते. श्री धैर्यशील रामगोंड पाटील व सौ ऐश्वर्या धैर्यशील पाटील यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून साकारलेल्या आर. के. इन मध्ये व्हेज, नॉन- व्हेज , एसी रूम आणि पब, बॅक्वेट हॉल सह नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्वागत रामगोंड पाटील सौ. कमलाक्षी रामगोंड पाटील यांनी केले.यावेळी किरण कदम, हारुण सय्यद , दीपक पाटील, गुंडया पाटील, मुरारी चिकोडे, सी.ए. संदीप पोटजाळे, विठ्ठल भमानगोळ, महेश सलवादे, अमर मांगले ,राहुल शिरकोळे, सतीश पाटील, गोड साखरचे अध्यक्ष प्रकाश पताडे यांच्या सह मान्यवर मंडळी उपस्थित होते. प्रास्ताविक सुरेश कोळकी यांनी केले. आभार सौ. ऐश्वर्या धैर्यशील पाटील यांनी मानले.