जिल्हाताज्या घडामोडी

कोल्हापूर गारगोटी मार्गांवर कळंबा येथे एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार :पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीचा मृत्यू : दुचाकीचा चक्काचूर

कोल्हापूर गारगोटी मार्गांवर कळंबा येथे एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार :

पत्नीच्या डोळ्यांदेखत पतीचा मृत्यू : दुचाकीचा चक्काचूर

सिंहवाणी ब्युरो कोल्हापूर :
कोल्हापूर गारगोटी मार्गांवर आदमापूर येथून देवदर्शन घेऊन परत येणार्‍या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सतीश लक्ष्मण धोंडफोडे (वय 58, रा. आदिनाथनगर, गोरक्षनाथ मंदिराजवळ, कळंबा) असे त्यांचे नाव आहे. पत्नीसमोरच पतीचा मृत्यू अशी ही दुदैर्वी घटना सोमवारी (दि. 20) रात्री 8.15 च्या सुमारास कळंबा पॉवर ग्रीड, घोडके मळा येथे घडली.ळ्य
धोंडफोडे हे पत्नी गीतासोबत दुचाकीवरून आदमापूर येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री ते कोल्हापूरला परतत होते. कळंबा परिसरात त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. पत्नी गीता यांना दुचाकीवरून खाली उतरवले. दुचाकी रस्त्यातून कडेला लावत असतानाच भरधाव एसटीने (क्र. एम. एच. 09 एफ एल 8132) त्यांना जोराची धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचा चक्काचूर झाला. डोळ्यांदेखत पतीचा तडफडून मृत्यू होताना पाहून गीता बेशुद्ध पडल्या. अपघातानंतर इतर वाहनचालकांनी वाहने थांबवून मदत केली. उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. धोंडफोडे यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. रस्त्यावर अंधार असल्याने गर्दीचा फायदा घेत एसटीचे चालक व वाहक पसार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button