एक गांधीवादी आदर्श जीवन : हिंदुराव आबिटकर १०० वर्षांचा चालता बोलता इतिहास

एक गांधीवादी आदर्श जीवन
हिंदुराव आबिटकर १०० वर्षांचा चालता बोलता इतिहास
ही एक ऐतिहासिक घटना आहे .भुदरगड तालुक्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे की ज्यांना शंभर वर्षाचा इतिहास
माहिती आहे .कुटुंब, गाव, तालुका येथील भौगोलिक सामाजिक शैक्षणिक परिवर्तनाचे ते साक्षी आहेत.
हिंदुराव विष्णुपंत आबिटकर हे शतायुष्यी आहेत किती भाग्याची गोष्ट आहे. तालुक्यातील पाच पिढ्यांना अभिमान वाटावा अशी व्यक्ती आहे.
त्यांची स्मृती अतिशय चांगली आहे. एक गोळी किंवा एक इंजेक्शन त्यांना घ्यावे लागत नाही. एक संयमी जीवन. दोन वेळा चहा .दोन वेळा जेवण एवढीच त्यांची माफक अपेक्षा. ताटामध्ये येईल ते जेवतील .झोप चांगली आहे.दररोज सायंकाळी उन्हाळा असो पावसाळा असो थंडी असो पाच किलोमीटर ते चालून येतात. एका तरुणाला लाजवण्यासारखे .कोणीही भेटला तर नम्रतेने नमस्कार करतात .
शेतावर आजही प्रेम आहे. कोणाशी संघर्ष नाही कोणाशी वाद विवाद नाही. तसं म्हणाल तर हे गांधीवादी जीवन. प्रसिद्धीची हाव नाही .सोन्याचा सोस नाही कोणाला उपदेश देण्याच्या भानगडी ते पडत नाहीत. खरंतर अनुकरणीय असे जीवन आहे.
हिंदुराव काकांना दीर्घायुष्य लाभो त्यांचे आरोग्य ठीक राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना .
डॉ. सुभाष के देसाई