जिल्हाताज्या घडामोडी

गारगोटी बाजारपेठेत अत्याधुनिक स्वच्छतागृहाची उभारणी ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

गारगोटी बाजारपेठेत अत्याधुनिक स्वच्छतागृहाची उभारणी :
ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
गारगोटी बाजारपेठेत तालुक्यातील व आसपासच्या तालुक्यातील ग्राहक व व्यापारी मोठया संख्येने येतात, या महिला वर्गाची संख्या मोठी असते, पण महिला ग्राहक व व्यापारी यांची स्वच्छता गृह नसल्याने गैरसोय होत होती, याची दखल घेऊन ग्रामपंचायतीने बाजारपेठेत महिला व पुरुषासाठी स्वतंत्र अत्याधुनिक स्वच्छता गृहाची उभारणी केली आहे. त्यामुळे महिला वर्गाची मोठी अडचण दूर झाली आहे. याबद्दल ग्रामपंचायतीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

गारगोटीत बुधवार आठवडा बाजारासाठी गारगोटी बाजारादिवशी व इतर दिवशी लोक येत असतांना शहरात सार्वजनिक स्वच्छता गृह नसल्याने सर्वांचीच गैरसोय होत होती, या अडचणीची दखल घेऊन गारगोटी ग्रामपंचायतीने बाजारपेठेत अद्ययावत पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहाची उभारणी केली आहे. गारगोटीचे सरपंच प्रकाश वास्कर, उपसरपंच राहुल चौगले व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे यासाठी सहकार्य लाभले. ग्रामपंचायतीच्या या कार्याचे कौतुक होत आहे.

फोटो 

-गारगोटी बाजारपेठेत उभारण्यात आलेली अत्याधुनिक स्वच्छता गृह

 

*गारगोटी ग्रामपंचायतीच्या* वतीने
गारगोटी शहरातील बाजारपेठ मधील, सर्व दुकानदार व व्यापारदार तसेच भाजी विक्रते महिला व नागरिकांच्या मागणीनुसार…. ग्रामपंचायत मार्फत *पुरुषांसाठी व महिलांसाठी* अत्याधुनिक प्रशस्त *सार्वजनिक शौचालय* सापळे गल्ली बाजारपेठ येथे बांधण्यात आलेले आहे. सदर शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून नागरिकांनी त्याचा योग्य रीतीने वापर करावा…

प्रकाश शंकर वास्कर
लोकनियुक्त सरपंच, गारगोटी.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button