देवचंद कॉलेज व निपाणी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षिततेसाठी जनजागृती : रॅलीचे आयोजन

देवचंद कॉलेज व निपाणी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षिततेसाठी जनजागृती : रॅलीचे आयोजन
सिंहवाणी ब्युरो: निपाणी
देवचंद कॉलेज, अर्जुननगर, क्विक हील फाऊंडेशन, पुणे आणि कर्नाटक राज्य पोलिस, सर्कल ऑफिस निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगत डिजिटल जगात जबाबदारीने वर्तन करण्याचे आवाहन केले. तसेच प्रा. प्रशांत कुंभार यांनी ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमाची माहिती सांगितली.
सायबर सुरक्षिततेसाठी जनजागृती रॅली मुरगूड ब्रिज परिसरातून निपाणी सर्कल ऑफिसचे सी. पी. आय. मा. श्री. बी. एस. तळवार यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.चन्नम्मा सर्कल व राम मंदिर येथे सायबर वॉरीयर्स कु. प्रतिक्षा नाईक, कु. स्वाती तांबेकर , कु, आदिती. घास्ते, कु. निशांत जाधव, कु. रुद्र सुतार, कु. हर्षदा पाटील, कु. अथर्व माने यांनी पथनाट्य (नुक्कड), कु. आदिती घस्ते ने रॅप व कु. रुद्र सुतार याने कविता अशा स्वरूपात लोकांना ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरील धोके, OTP व बँक माहिती गुप्त ठेवण्याचे महत्त्व व सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे उपाय यावर मार्गदर्शन केले. तसेच सर्व वॉरीयर्सनी बाजारपेठेत जाऊन प्रत्यक्ष लोकांना सायबर सुरक्षेचे धडे दिले.
या प्रसंगी कर्नाटक राज्य पोलिस अधिकारी पी. एस. आय. श्री. शिवानंद कार्जोळ, पी. एस. आय. श्री. रमेश पवार व पी. एस. आय. श्री. नायकवडी, क्विक हील फाऊंडेशन देवचंद कॉलेज क्लबचे प्रतिनिधी, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मेजर डॉ. अशोक डोनर, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी प्रा. विष्णू पाटील, सदस्य श्री. बिपिन पाटील, श्री. अशोक कुराडे, श्रीमती. राणी सोकासने, श्रीमती आशा साळुंखे, श्रीमती पी. बी. शेटके, डॉ. सी. एम. नाईक, डॉ.रमेश साळुंखे, डॉ.यादव प्रा.सागर परीट इत्यादी शिक्षकवृंद, एन. सी. सी. कॅडेट्स, व्हाईट आर्मी कॅडेट्स व एन. एस. एस. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमान आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ सौ.तृप्ती भाभी शाह, खजिनदार सुबोधभाई शाह यांचे मार्गदर्शन लाभले.
