कॉग्रेसचे अप्पी पाटील, सरपंच गिरीजादेवी शिंदे- नेसरीकर भाजपा त दाखल; कोल्हापुर जिल्ह्यात खळबळ!

कॉग्रेसचे अप्पी पाटील, सरपंच गिरीजादेवी शिंदे- नेसरीकर भाजपा त दाखल; कोल्हापुर जिल्ह्यात खळबळ!

सिंहवाणी ब्युरो / डॉ सुनील देसाई, गडहिंग्लज
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यात आमदार शिवाजी पाटील यांच्या राजकीय खेळीतून कॉग्रेसचे विनायक तथा अप्पी पाटील व नेसरीच्या सरपंच सौ गिरीजादेवी शिंदे नेसरीकर यांचा मंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला . त्यामुळे गडहिंग्लज उपविभागातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत .
विनायक तथा अप्पी पाटील यांनी गतवेळची निवडणूक कॉग्रेसचे तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून शिवाजी पाटील यांच्या विरोधात लढविली होती. परंतु त्यांना सलग दोन वेळा अपयश आले. कर्नाटकातील बडे राजकीय प्रस्थ जारकीहोळी यांचे अप्पी पाटील मेहुणे होत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अप्पी पाटील गटाला सन्मानजनक जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.
सरपंच नेसरीकर यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाने नेसरी जि. प. मतदार संघातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.
शुक्रवारी मुंबई येथे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याने त्यांचा भाजपा पक्ष प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. शनिवारी दुपारी कोल्हापूर येथे अप्पी पाटील व नेसरीच्या सरपंच गिरीजादेवी संग्रामसिंह शिंदे- नेसरीकर यांनी मंत्री चंदकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसमवेत भाजपात प्रवेश केला. अप्पी यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाने कॉग्रेसच्या आम. सतेज पाटील, खास. शाहू महाराज यांना धक्का बसला आहे.
यावेळी आम. अमल महाडिक, सुरेश हाळवणकर, संजय बाबा घाटगे, नाथाजी पाटील महेश जाधव अशोक चराटी राहुल चिकोडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
