अक्कलकोट मध्ये गाठला अवैध हातभट्टी दारूने कळस तर अवैध धंद्यानी मांडला उच्छाद : क्लोज झालेला मटका पुन्हा ओपन

अक्कलकोट मध्ये गाठला अवैध हातभट्टी दारूने कळस तर अवैध धंद्यानी मांडला उच्छाद :
क्लोज झालेला मटका पुन्हा ओपन
सिंहवाणी ब्युरो l महेश गायकवाड, अक्कलकोट
अक्कलकोट मध्ये अवैध धंद्यानी उच्छाद मांडलेला असतानाच हातभट्टी दारूने मात्र गावोगावी कळस गाठला आहे. अक्कलकोट शहर व तालुक्यातील अवैध धंद्यामुळे सर्वसामान्य माणूस गोरगरीब, मजूर, कामगार, यांचे संसार उध्वस्त होऊ लागले असून सरकारने गोरगरिबांचे संसार उध्वस्त होण्यासाठी अवैध धंद्यांना राजाश्रय देत आहे. का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अक्कलकोट शहरात व तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आणि अवैध हातभाटी दारू ने अवैध सावकारी धंद्याने उच्छाद मांडला आहे.
अक्कलकोट मध्ये तर गेल्या महिन्यात बंद झालेला मटका व्यवसाय वसूलदार आणि मटका एजंट व मटका कंपन्या यांच्यात अर्थपूर्ण झालेल्या वाटाघाटी नंतर पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत.
तडजोडी नंतर अक्कलकोट मध्ये क्लोज झालेला मटका पुन्हा ओपन
करण्यात आल्यामुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. तर हफ्ता घेणाऱ्यांचे ही मोठ्या प्रमाणात सगळे भागवले जात आहे.जात आहे.
तडजोड झाल्यावर अक्कलकोट मध्ये क्लोज झालेला मटका पुन्हा ओपन करण्यात आला आहे.
तशी परवानगी वसुलदाराने दिली असल्याची चर्चा मटका वर्तुळातून सुरू झाली आहे
अक्कलकोट शहरात व तालुक्यात गेल्या एक महिन्यांपासून मटका क्लोज करण्यात आला होता क्लोज करण्याचे कारण हे हे तडजोड करून घेण्यासाठी होते असे कळते मटका बुकी कंपन्यांनी आणि मटका एजंट लोकांनी तडजोडीत होकार देऊन एस म्हटल्याचे कबूल केल्या नंतर एक महिना पासून क्लोज असलेला मटका पुन्हा ओपन झाला आहे
आज पासून तितक्याच जोमाने आणि उघडपणे अक्कलकोट शहरातील सर्वत्र मटका घेत असल्याचे चित्र आज दिसून आले.
अक्कलकोट शहरात व तालुक्यात गुपचूप लपून छपून हा मटका सुरू होता, परंतु अधिकृत एजंट आणि कंपन्या नी उघडपणे क्लोज केला होता आता तो आज मंगळवार पासून सुरळीत आणि बिनबोभाट सुरू झाला आहे
अक्कलकोट शहर बीट अंतर्गत अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे अवैध धंदे जोमाने सुरू असून हातभाटी दारू विक्री गांजा विक्री तसेच व्याजबट्टी धंदे चोरटी वाळू उपसा आणि वाळू वाहतूक हे बिनबोभाट सुरू झाले आहेत अक्कलकोट शहरात हातभट्टी दारू विक्री क्लब जुगार अड्डे तसेच व्याज बट्टी आणि अवैध प्रवासी वाहतूक जोमाने सुरू आहेत
अक्कलकोट एस टी बस स्टँड ला अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जिप गाड्यांनी तर विळखा घातला असून या कडे कुणाचेही लक्ष राहिले
अक्कलकोट शहरात ट्रॅफिक चे तीन तेरा उडाले असून सर्वत्र वाहतूक विस्कळीत होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. व्तरीही या कडे कुणाचेही लक्ष राहिले नाही.
अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील मोठ्या प्रमाणात अवैध धंदे अवैध वाहतूक आणि हातभट्टी दारूचे अड्डे कार्यरत राहिले असून या कडे अर्थ पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे.
अक्कलकोट शहर व तालुक्यातील अनेक ठिकाणी हातभट्टी दारू बनावट शिंदी मटका क्लब जुगार व व्याजबट्टी धंदे अवैध प्रवासी वाहतूक चोरटी वाळू वाहतूक असे सर्व प्रकारचे अवैध धंदे आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून या बाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे तक्रार करणार आहोत अशी माहिती भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संजय रणदिवे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलताना दिली.