ताज्या घडामोडी

किल्ले भुदरगड पर्यटन स्थळ पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतील – पालक मंत्री प्रकाश आबिटकर भुदरगड किल्यावर साहसी खेळांच्या अक्टिव्हिटींचा शुभारंभ

किल्ले भुदरगड पर्यटन स्थळ पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतील
पालक मंत्री प्रकाश आबिटकर


भुदरगड किल्यावर साहसी खेळांच्या अक्टिव्हिटींचा शुभारंभ

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
किल्ले भुदरगड येथे पर्यटक आकर्षित होतील असे सुंदर पर्यटन स्थळ बनविण्यासाठी व येथे येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा मिळण्यासाठी आणि गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन अबाधित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बोलताना व्यक्त केले ते किल्ले भुदरगड येथे पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग, झोरबिंग बॉल, वॉटर बोटिंग, कायाकिंग, टेलिस्कोप, फ्लोटिंग जेटी,कोल्हापूर वन पर्यटंन वेबसाईट या साहसी खेळांच्या अक्टिव्हिटींचा शुभारंभ प्रसंगी ते बोलते होते


मंत्री प्रकाश आबिटकर बोलताना म्हणाले बाहेरून येणाऱ्या पर्यटकाना चांगल्या सुखसोई उपलब्ध करून देण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे या बरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने भागातल्या माणसांच्या अर्थ कारणाला गती देण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करावयाचे आहे येत्या दोन-तीन महिन्यात भैरवनाथ मंदिराच्या कामाचा शुभारंभ आपण करणार आहोत मंत्री आबिटकर यांच्या प्रयत्नातून व दुरदृष्टीतून ऐतिहासिक किल्ले भुदरगडचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यात येत असून किल्ल्यांच्या विकासाबरोबर येथे लहान मुलांसाठी बालोद्यान तसेच गडावरील तलावात पर्यटनासाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून लवकरच पॅराग्लायडिंग पॅरामोटरिंग, बोर्डिंग बॉल, वॉटर बोटिंग, कायाकिंग, टेलिस्कोप, फ्लोटिंग जेटी सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे त्यामुळे पर्यटकांना हि मोठी पर्वणी ठरणार आहे
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथांची पाटील म्हणाले सध्या किल्ले भुदरगडावर पर्यटकांचे आकर्षण वाढत आहे त्या मुळे गडाच्या सौंदर्यावर भर घालण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर नेहमी प्रयत्नशील आहेत त्यांच्या प्रयत्नातून भुदरगड किल्ला तटबंदी दुरुस्ती, पदपथ करण्यासाठी गडावरील भैरवनाथ मंदिर परिसर व सुशोभिकरणासाठी गडावर पाणतलावात बोटिंग व टेलिस्कोप करण्यासाठी तसेच गडावर बालोद्यान विकसित करण्यासाठी मोठा निधी खर्च करण्यात येत आहे त्यामुळे भुदरगड किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकाना चांगल्या सुखसोई या माध्यमातून मिळणार आहेत किल्ले भुदरगड हे ठिकाण मोठ्या उंचीवर असल्याने येथे पर्यटकांना प्याराग्लायडिंगची मोठी संधी आहे ही संधी ओळखून येथे वन विभाग व पर्यटन विभागाच्या माध्यमातून लवकरच पॅराग्लायडिंग सह सर्व कामाचा शुभारंभ आज करण्यात आला आहे त्यामुळे भुदरगड किल्ला देशभरातील पर्यटकांना पर्वणी व आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे या कार्यक्रमाला सर्जेराव देसाई,बाळकाका देसाई, दौलतराव जाधव, अलकेश कांदळकर, नाथाजी पाटील, विद्याधर परीट,के जी नांदेकर, शिवाजी राणे, दत्तात्रय उगले, सुनीलराव निंबाळकर, मदनदादा देसाई, नंदकुमार ढेंगे, व्ही जे कदम, रामभाऊ शिऊडकर,यांच्यासह नागरीक उपस्थित होते आभार सुनील किरोळकर यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button