गारगोटी हायस्कूल व समर्थ ज्युनिअर कॉलेजचे समाजसेवा शिबीर उत्साहात संपन्न

गारगोटी हायस्कूल व समर्थ ज्युनिअर कॉलेजचे समाजसेवा शिबीर उत्साहात संपन्न
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे समाजसेवा शिबीर श्री.दत्त मंदिर शेणगाव, श्री.भैरवनाथ मंदिर, पुष्पनगर व किल्ले भुदरगड येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता केली.
गारगोटी हायस्कूलच्या इ.५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांचे समाजसेवा शिबीर श्री.दत्त मंदिर शेणगाव येथे पार पडले. यावेळी श्री.मिलिंद ताम्हणकर (काका) यांनी श्री दत्त मंदिराचा इतिहास व महात्म्य याबाबत माहिती दिली. तर वजीर मकानदार यांचे विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक व्याख्यान झाले. इ. १० वीच्या विद्यार्थ्यांचे समाजसेवा शिबीर श्री.भैरवनाथ मंदिर, पुष्पनगर येथे पार पडले.
प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या समाजसेवा शिबिरात डी.जी.लकमले, जी डी. ठाकूर, बी. ए. डावरे, आर. पी. गव्हाणकर, पी.पी.भंडारी, एस.एम.साळवी, युवराज शिगावकर, बी. के. इंगळे, राजेश गिलबिले, ऋषिकेश गव्हाणकर, धीरज मेंगाणे, व्ही. एम. परीट यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
ज्युनिअर कॉलेजचे समाजसेवा शिबीर किल्ले भुदरगड येथे पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी श्री. भैरवनाथ मंदिर परिसर, तलाव परिसराची स्वच्छता केली. यावेळी प्रा.शेखर देसाई, प्रा.सौ. रोहिणी निकम, प्रा.सौ.स्नेहा साळोखे यांनी मार्गदर्शन केले.