शेतकऱ्यांच्या पुढाकाराने तब्बल ३० वर्षानंतर कोनवडे येथील पानंदीने घेतला मोकळा श्वास : ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त

शेतकऱ्यांच्या पुढाकाराने तब्बल ३० वर्षानंतर कोनवडे येथील पानंदीने घेतला मोकळा श्वास
ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त
सिंहवाणी ब्युरो / कुर :
– कोनवडे ( ता . भुदरगड ) येथील सावर शेताकडील पाणंदीने तब्बल ३० वर्षानंतर शेतकऱ्यांच्या पुढाकाराने भुदरगड तहसीलदारांच्या सहकार्याने खुला केला . त्यामुळे ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त होत आहे .
कोनवडे येथील सावर शेताकडे जाणारी पानंद शासकीय दफ्तरी नोंद आहे . सध्या नोंद पानंद रस्ता शेतीचे तुकडीकरण झाल्याने , शेतकऱ्यांच्या गटाच्या मध्यातुन जात होती . होणारे नुकसान जास्त असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी विचार करत सरबांधावरून दोन्ही शेतकऱ्यांच्या गटातुन चार -चार फुट घेत आठ फुटांची पाणंद रस्ता करण्यात आला .
या पाणंदीमध्ये ५० ते ६० एकरातील शेतीच्या वाहतुकीचा प्रश्न होता . सर्व क्षेत्र बागायती असल्याने ऊस पिक असल्याने ऊस वाहतुकीचा प्रश्न जटील बनला होता . वाहतुकीसाठी १ ते .१ .२५ कि मीचे अंतर पायवाटेनच करावे लागत होते . त्यामुळे शेतकऱ्यांना ये जा करताना नाहक त्रास होता .
याबाबत शेतकऱ्यांनी कुर मंडल अधिकाऱ्यांमार्फत भुदरगड तहसीलदारांना निवेदन दिले होते . तहसीलदार अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पानंद रस्ताचा प्रश्न मार्गी लावला .
शेतकऱ्यांच्या वतीने सरबांधावरून दोन्ही बाजुच्या शेतकऱ्यांच्या वतीने चार – चार फुट घेत आठ फुटांचा रस्ता करण्यास सुरवात केली .पहिल्या टप्यामध्ये १ ते १ .२५ कि मी अंतरावरील पानंद रुंदीकरणाबरोबर मुरुम पसरुन रस्ता करून घेतला .बऱ्याच वर्षानंतर पानंद रस्ता प्रशस्त झाल्याने ग्रामस्थातुन समाधान व्यक्त होत आहे . याकामी तहसीलदार अर्चना पाटील , सर्कल सुरेश जंगली , तलाठी रणजीत पाटील , ग्रामस्थ , ग्रामपंचायत , शेतकरी यांचे सहकार्य आहे .
कोनवडे येथील सावर शेताकडील पाणंद रस्ता शेतकऱ्यांनी पुढाकार घेत १ ते १ .२५ कि मी पाणंदीचे काम पुर्ण केले आहे . यामुळे शेतकऱ्याची सोय झाली असुन, येत्या काळात या भागातील शेतीसाठी आधुनिक यांत्रीकीकरणाचा वापर होणार आहे. त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढणार आहे . तसेच प्रशासनाचे शेतकऱ्यांना नेहमीच सहकार्य लाभणार आहे .
= अर्चना पाटील
तहसीलदार भुदरगड
फोटो –
कोनवडे : येथील सावर शेतकडील पाणंद रस्ता खुला करताना तहसीलदार अर्चना पाटील ,सर्कल सुरेश जंगली , तलाठी रणजीत पाटील , ग्रामस्थ , शेतकरी