जिल्हाताज्या घडामोडी
जिथं देशाचे भविष्य घडते, अशी ज्ञान मंदिरे समृद्ध झाली पाहिजेत : प्रा. अर्जुन आबिटकर बारवे येथे शाळा खोल्यांचे उद्घाटन

जिथं देशाचे भविष्य घडते, अशी ज्ञान मंदिरे समृद्ध झाली पाहिजेत : प्रा. अर्जुन आबिटकर
बारवे येथे शाळा खोल्यांचे उद्घाटन
सिंहवाणी ब्युरो / पिंपळगाव :
जिथं देशाचे भविष्य घडते, अशी ज्ञान मंदिरे समृद्ध झाली पाहिजेत, तरच देश महासत्ता होईल. बारवेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, पवित्र पांडवकालीन ज्योतिर्लिंग मंदिर व बारवेची वेगळी ओळख निर्माण करूया, असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालक प्रा. अर्जुन आबिटकर यांनी केले. बारवे विद्यामंदिरच्या दोन खोल्यांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच मारुती पाटील होते. मुख्याध्यापक प्रकाश इंगळे यांनी प्रास्ताविक केले. सुनील किरोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रामभाऊ शिऊडकर, तानाजी धारपवार, संजय गुरव, योगेश पाटील यांचा सत्कार झाला. उपसरपंच सायली राणे, सारिका पाटील, मेघा परीट, धनश्री सुतार आदी उपस्थित होते.