जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रविशेष

भुदरगड तालुक्यात वाघाने धनगराची गाय मारली : माणुसकीच्या दृष्टीतून नुकसान भरपाई मिळावी : डॉ सुभाष के देसाई

भुदरगड तालुक्यात वाघाने धनगराची गाय मारली :


माणुसकीच्या दृष्टीतून नुकसान भरपाई मिळावी : डॉ सुभाष के देसाई


सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
गिरगांव ( ता. भुदरगड ) धनगर वाडा येथे वाघाने गाय मारल्याची घटना घडली आहे. ही गाय चिचू झोरे या गरीब भूमिहीन धनगराची आहे. या घटनेकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले असल्यामुळे धनगरांस नुकसान भरपाई मिळेल का? अशी शंका धनगरांना वाटते आहे़
या भागात वाघ नाहीत, असे मानले जात असतानाच ही घटना घडल्याने वाघाचे अस्तित्व ठळक होत आहे. हा वाघ नसून बिबट्या असावा, असे काही जणांचे मत आहे. पण धनगरांच्या म्हणण्यानुसार इतकी मोठी गाय मारून दुरवर ओढून बिबट्या नेऊ शकत नाही.. तो वाघच अहे.
जेष्ठ पत्रकार, विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यानी गिरगांव धनगर वाड्यास भेट देऊन व पहाणी धनगरांशी चर्चा केली. या बाबत सिंहवाणीशी बोलताना डॉक्टर सुभाष देसाई यांनी सांगितले की,
येथून 15 किलोमीटर अंतरावर गिरगाव ही धनगर वस्ती आहे तेथे राहणाऱ्या धनगरांची पंधरा-वीस घरे आहेत. हे सारे भूमिहीन असून गाई, शेळ्या मेंढ्या पाळून उपजीविका करतात काही शहरात येऊन लहान मोठी कामे करतात या धनगरापैकीच एक चिचू झोरे हा आहे त्याच्या आग्रहामुळे मी त्याच्या घरी जाऊन आलो. जवळच्या वनविभागाच्या दाट जंगलामध्ये जंगली जनावरे आहेत अधून मधून या धनगरांच्या शेळ्या मेंढ्या वाघ आणि बिबट्या यांच्या हल्ल्याला बळी पडतात काही वर्षांपूर्वी चिचू झोरेची जनावरे ढाण्या वाघाने मारली होती चारच दिवसांपूर्वी चरायला सोडलेल्या एका पांढऱ्या गाईवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले आता यापूर्वी मिळाले तशी नुकसान भरपाई वनविभाग देणार का? असा प्रश्न या गरीब धनगरांना पडला आहे.
वनविभागाचे कायदे कडक आहेत. विनापरवाना त्यांच्या हद्दीत जनावर चरले तर कदाचित त्याची नुकसान भरपाई ते देत नसावेत पण कायदा थोडा वेळ बाजूला ठेवून माणुसकीच्या दृष्टीतून ह्या भूमिहीन धनगरांना शासनाने मदत करावी अशी, अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button