श्री मौनी विद्यापीठ एनसीसी विभागामार्फत एनसीसी दिन उत्साहात साजरा

श्री मौनी विद्यापीठ एनसीसी विभागामार्फत एनसीसी दिन उत्साहात साजरा
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
श्री मौनी विद्यापीठ गारगोटी येथील 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी व 56 महाराष्ट्र बटालियन एनसीसी मार्फत एनसीसी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन मधुकर देसाई (आप्पा) यांच्या हस्ते अनामिका स्तंभास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. एनसीसी कॅडेट मार्फत गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला . मान्यवरांच्या हस्ते एनसीसी ध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली. यावेळी एनसीसी कॅडेट ना देशसेवेची शपथ देणेत आली . सेकंड ऑफिसर स्वाती यादव यांनी प्रतिज्ञा वाचन केले. तसेच सर्व कॅडेट्सनी उत्साहामध्ये एनसीसी गीत गायले.
याप्रसंगी शासकीय प्रतिनिधी बाजीराव चव्हाण, कर्मचारी प्रतिनिधी डॉ. अरविंद चौगले, उपप्राचार्य डॉ. एस. बी. देसाई, जितकर सर, मुख्याध्यापक डॉ. एस. बी. शिंदे, लेफ्टनंट इंदिरा माने, लेफ्टनंट साताप्पा केणे, सेकंड ऑफिसर सचिन भांदिगरे, सेकंड ऑफिसर स्वाती यादव,तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विक्रम भोसले यांनी सूत्रसंचालन केले