जिल्हाताज्या घडामोडी
आंबेडकरी जनतेच्यावतीने गारगोटीत संविधान दिन उत्साहात साजरा

आंबेडकरी जनतेच्यावतीने गारगोटीत संविधान दिन उत्साहात साजरा
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
भुदरगड तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
प्रारंभी पंचायत समिती समोरील. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सभापती गोपाळराव कांबळे, विजय आदित्य यांनी मार्गदर्शन केले. आभार व्ही. जे. कदम यांनी मानले.
यावेळी दलितमित्र पी. एस. कांबळे, एस. के. कांबळे, बिद्रीचे माजी संचालक सुनील कांबळे, बी.आर. कांबळे, मिलिंद पांगिरेकर, आर.एस. कांबळे, नंदू गडकरी, दयानंद माने, भिकाजीराव कांबळे, संजय कांबळे, बाळासाहेब कांबळे, साताप्पा कांबळे, यशवंत सरदेसाई,श्रीकांत कांबळे, के.के. कांबळे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.