क्रीडाजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गारगोटीतील डॉ. पांडुरंग गिरी यांचे 42 कि.मी. टाटा मॅरेथॉन मुंबई स्पर्धेत सुयश

गारगोटीतील डॉ. पांडुरंग गिरी यांचे 42 कि.मी. टाटा मॅरेथॉन मुंबई स्पर्धेत सुयश
सिंहवाणी ब्युरो / मुंबई
आशियातील सर्वात जास्त अंतराची म्हणजे 42.2 किलोमीटर लांबीची टाटा मॅरेथॉन मुंबई ही स्पर्धा डॉक्टर पांडुरंग गिरी यांनी फक्त ०४.३८.४६ तास इतक्या कमी वेळात पूर्ण केली. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉक्टर पांडुरंग गिरी सध्या वृंदावन हॉस्पिटल गारगोटी येथे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. ते एमडी मेडिसिन असून मधुमेह तज्ञ आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला असून यश मिळवले आहे.