दहावीच्या परिक्षेमध्ये काॅपी रोखण्यासाठी कडक उपाययोजना : खासगी क्लास शिक्षकांवर विशेष लक्ष : उपद्रवी केंद्रावर कॅमे-यांचा वाॅच,

दहावीच्या परिक्षेमध्ये काॅपी रोखण्यासाठी कडक उपाययोजना :
खासगी क्लास शिक्षकांवर विशेष लक्ष
: उपद्रवी केंद्रावर कॅमे-यांचा वाॅच,
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :
भुदरगड तालुक्यातील आठ केंद्रावर १ हजार ८०० विद्यार्थी दहाविची परिक्षा देणार आहेत. काॅपीला चाप लावण्यासाठी तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली असून कडक उपाययोजना केल्या असल्याची माहिती परिक्षा नियंत्रक प्रबोद्ध कांबळे यांनी दिली.
श्री शाहू कुमार भवन गारगोटी, वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल गारगोटी,
कुमार भवन पुष्पनगर,
दौलत विद्यामंदिर मडिलगे,
आर. व्ही. देसाई हायस्कूल मिणचे, प.बा पाटील हायस्कूल मुदाळ, कुमार भवन कडगाव
सेंट फ्रान्सिस हायस्कूल तिरवडे या केंद्रावर दहावीची परीक्षा होईल.
उपद्रवी केंद्रावर करडी नजर…
श्री शाहू कुमार भवन गारगोटी, कुमार भवन पुष्पनगर,
दौलत विद्यामंदिर मडिलगे,
कुमार भवन कडगाव,
सेंट फ्रान्सिस हायस्कूल तिरवडे या केंद्रावर करडी नजर ठेवण्यात आली आहे.
उपद्रवी केंद्रावरती संबंधित शाळेचा तसेच त्या केंद्राशी संलग्न असणाऱ्या शाळेचा कोणताही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहू शकणार नाही. सदरच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे इतर केंद्रावरती केलेली आहे.
जसे की तिरवडे केंद्रावरील स्टाफ हा दौलत विद्या मंदिर मडिलगे येथील परीक्षेचे कामकाज पाहणार आहे.
दौलत विद्यामंदिर मधील हे येथील स्टाफ कुमार भवन पुष्पनगर येथे परीक्षेचे कामकाज पाहणार आहे. अशी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चिठ्ठ्या टाकून आदलाबदल करण्यात आली आहे.
कॅमे-यांचा राहणार वाॅच….
उपद्रवी केंद्रावर बोर्डाने कॅमेरेमॅन तैनात केले असून या कॅमेरे मॅनची परिक्षा केंद्र, परिसरावर वाॅच राहणार आहे. परिक्षा पेपर उघडताना शुटींग करण्यात येणार आहे.
परिक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्ता बरोबरच जिल्हा पथकं, फ्लाईंग स्काॅडचे विशेष लक्ष राहिल. यामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार यांचा समावेश असेल. प्रत्येक केंद्रावर तलाठी, महसूल, सहायक विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी व पंचायत समितीचे अधिकारी, आयसीडीएसचे कर्मचारी यांची १४ पथके बैठी राहणार आहेत. खबरदारीची उपाय योजना म्हणून परिक्षा केंद्र असलेल्या सर्व ठिकाणची झेरॉक्स सेंटरही बंद करण्यात येणार आहेत. परिक्षा रुममध्ये काॅपी सापडल्यास शिक्षक निलंबित होणार याशिवाय केंद्रप्रमुखावर देखील कारवाई होणार.