राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देवचंद महाविद्यालयामध्ये सेंद्रिय शेती प्रतिकृती प्रदर्शन

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त
देवचंद महाविद्यालयामध्ये सेंद्रिय शेती प्रतिकृती प्रदर्शन

सिंहवाणी ब्युरो / निपाणी
देवचंद महाविद्यालयातील कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभागामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रतिकृती प्रदर्शन भरवण्यात आले. सदर प्रदर्शनाचे उदघाटन वेंकटेश्वरा कॉपरेटीव पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड, नाशिक चे कोर कमिटी अडवाईजर मा. श्री. सदाशिवराव चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी उदघाटन प्रसंगी वेंकटेश्वरा कॉपरेटीव पॉवर अँड ऍग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती सांगितली. सदर संस्थेने महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर सेंद्रिय शेती या विषयावरती अनेक मोठे प्रकल्प हाती घेतले असुन त्याचा विस्तार संपूर्ण देशामध्ये करण्याचा मानस आहे असे त्यांनी सांगितले. रासायनिक खते व कीटकनाशक यांच्या अतिरिक्त वापरामुळे शेती, हवा व पाण्याचे प्रदूषण वाढत असून त्याचा दुष्परिणाम मानवी जीवनावरती होत असून मनुष्य अनेक प्रकारच्या रोगांना बळी पडत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती हि काळाची गरज असून त्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती पुरवणे व सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन करणे हे प्रामुख्याने शेती शास्त्रज्ञ व शेतीशी निगडित विद्याथ्यांनी करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीमुळे विषमुक्त शेती उतपादने तयार करणे हा प्रमुख उद्देश ठेवून विद्यार्थ्यांनी कार्य करणे गरजेचे आहे . सेंद्रिय उत्पादनांना जागतिक बाजारपेठांमध्ये मोठी मागणी असून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थर उंचावण्यासाठी सेंद्रिय शेती करणे फायद्याचे ठरते असे ते म्हणाले. सेंद्रिय उत्पादनातून अनेक प्रकारचे सेंद्रिय उत्पादन तयार करता येत असून हि एक नवयुवकांसाठी उद्योजक होण्यासाठी मोलाची संधी आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष्य स्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. श्रीमती जी. डी. इंगळे ह्या होत्या. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये शेतीचे महत्व व शेतीशी संबंधित अभ्यास किती महत्वाचा आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच शेतीसंबंधित अभ्यासक्रमांचा वापर करून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेती करू शकतो व यामध्ये शेतीशास्त्रज्ञांचे खुप महत्वाचे योगदान असणार आहे असे सांगितले. सादर प्रदर्शनामध्ये वीसहून अधिक विज्ञान प्रातिकृती प्रदर्शित करण्यात आल्या. त्यामध्ये सॉईल प्रोफाईल, गांडूळखत, दशपर्णी अर्क, जीवामृत, रेशीम शेती, व्हर्टिकल फार्मिंग, हायड्रोपोनिक्स व अनेक प्रकारचे कामगंध सापळे यांचा समावेश करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभागाच्या एम. एस्सी. भाग एक व दोन च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सादर कार्यक्रमाचा लाभ 140 पेक्ष्या जास्त विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला.
सदर कार्यक्रमाचे प्रस्थाविक व पाहुन्यांचे स्वागत कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख प्रो. पी. डी. शिरगावे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. अमृता गोंधळी यांनी केले व कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने प्रा. सोनाली कुंभार यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी विभागातील प्रा. किरण अबिटकर, प्रा. ओंकार कोष्टी व इतर कर्मचारी उपस्थित होते.