क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेश

भारतचं चॅम्पियन ! टीम इंडियाने रचला इतिहास, 12 वर्षांनंतर जिंकली चॅम्पियन ट्रॉफी

भारतचं चॅम्पियन !

टीम इंडियाने रचला इतिहास,
12 वर्षांनंतर जिंकली चॅम्पियन ट्रॉफी


वृत्तसेवा / नवी दिल्ली
इंडियाने 6 विकेट राखून न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. टीम इंडियाने तब्बल 12 वर्षानंतर ही ट्रॉफी जिंकली आहे. त्याचसोबत 2000 साली न्यूझीलंडने फायनलमध्ये भारताचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. या पराभवाचा बदला आज टीम इंडियाने 25 वर्षानंतर घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा विजय आहे.

टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि चायनामॅन कुलदिप यादव आणि वरूण चक्रवर्ती ठरला आहे. कारण धावांचा पाठलाग करताना रोहितने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर अय्यरने 48 धावांची खेळी केली आहे. तर गोलंदाजी दरम्यान कुलदिप यादव आणि वरूण चक्रवर्ती प्रत्येकी 2 विकेट काढल्या होत्या. या खेळाडूंसह के एल राहुल देखील टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

या अर्धशतकानंतर रोहित शतक ठोकेल अशी आशा होती. या दरम्यान शुभमन गिल कॅच आऊट झाला. ग्लेन फिलिप्सने त्याची उत्कृष्ट कॅच घेतली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला होता. मात्र तो देखील अवघ्या दोन बॉलमध्ये माघारी गेला. ब्रेसवेलने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला होता.
गिल आणि विराटची विकेट पडल्यानंतर टीम इंडियाने सावधगतीने खेळायला सूरूवात केली. पण सावधगतीने खेळताना रोहितवर दबाव वाढला आणि मोठा शॉर्ट खेळताना तो 76 धावांवर स्टंम्पआऊट झाला. त्यानंतर अश्रर पटेल आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला होता.

पण श्रेयस आपल्या अर्धशतकाच्या नजीक असताना अवघ्या 48 धावांवर मिचेल सँटनरच्या बॉलवर आऊट झाला. त्यानंतर के एल राहुल मैदानात उतरला होता. त्यामुळे अक्षर आणि राहुल टीम इंडियाला विजयापर्यंत नेतील अशी आशा होती. पण इतक्यात अक्षर मोठा शॉर्ट खेळताना 29 धावा करून बाद झाला. अक्षर बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या मैदानात उतरला होता. यावेळी पंड्या 18 धावा करून बाद झाला.

त्यानंतर के एल राहूलने नाबाद 34 धावा केल्या. के एल राहुलच्या बॅटीतून मोक्याच्या क्षणी आलेल्या या धावांमुळे टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे. यावेळी रविंद्र जडेजानेही 9 धावा केल्या. या खेळीत त्याने विजयी चौकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियासमोर 251 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरूवात करून दिली होती. रोहित शर्माने वादळी खेळी करत 41 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button