म्हणे सिंहवाणीने वृत्त प्रकाशित केल्याने लाचखोर शिक्षकाची बदनामी.. एसीबीवाले पैसे घेऊन कारवाया करतात.. मीडियावाले त्याला साथ देतात.. एका तथाकथित प्राध्यापकांने तोडले अकलीचे तारे

म्हणे सिंहवाणीने वृत्त प्रकाशित केल्याने लाचखोर शिक्षकाची बदनामी..
एसीबीवाले पैसे घेऊन कारवाया करतात.. मिडियावाले साथ देतात..
एका तथाकथित प्राध्यापकांने तोडले अकलीचे तारे
सिंहवाणी संपादकीय / किशोर आबिटकर
दाखल्यांसाठी तीन हजाराची लाच घेताना लाचलुतपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचून रंगेहात पकडलेल्या कोल्हापुरातील एका प्रभारी मुख्याध्यापकाची बदनामी सिंहवाणी लाईव्ह न्यूज ने प्रसारित केलेल्या वृत्तामुळे झाली असून माध्यमावर न्यायालयीन कारवाई करण्यासाठी आपण संबंधित लाचखोर शिक्षकास सांगणार आहोत, लाचलुचपत विरोधी खात्याचे पोलीस पैसे घेऊन अशा कारवाया करतात.. माध्यमे त्यांना साथ देतात.. आपला टीआरपी वाढवण्यासाठी व पैसे कमावण्यासाठीच अशा बातम्या प्रसारित करतात.. सर्वच यंत्रणा करप्ट झाली आहे. सापळा कारवाई झाल्या नंतर बातमी न देता निकाला नंतरच अशा बातम्या द्याव्यात.. असे अकलेचे तारे एका तथाकथित प्राध्यापकांने सिंहवाणीशी दुरध्वनीवरुन बोलताना तोडले
कोल्हापुरातील या प्रभारी मुख्याध्यापक शिक्षकाला काल कोल्हापूर अँटी करप्शन विभागाने सापळा रचून 3000 ची लाच घेताना रंगेहात पकडले. या घटनेची माहिती माध्यमांना एसीबीने दिली, त्यानुसार विविध ठिकाणी हे वृत्त प्रसारित झाले होते. या वृत्तामुळे शैक्षणिक क्षेत्राची संबंधित लाचखोर शिक्षकाची बदनामी झाली म्हणून लाच घेणाऱ्या शिक्षकाच्या एका हितचिंतक तथाकथित प्रोफेसर ने सिंहवाणीला दूरध्वनी करून जाब विचारला. या शिक्षकाच्या बदनामीस सिंहवाणीचे वृत्त कसे जबाबदार आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. या इसमास एसीबी कडे विचारणा करा, पोलिसांकडे विचारणा करा, असे वारंवार सांगूनही आपलेच घोडे पुढे दामटत न्यायालयीन कारवाई करण्याची धमकी देण्याचा प्रयत्न केला.
या महाभाग तथाकथित प्राध्यापकाला अँटी करप्शन विभागाची कारवाई कशी होते, त्याची प्रक्रिया काय, सापळा कसा रचला जातो त्यातून रंगेहात पकडणे म्हणजे? काय याची काहीही माहिती नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ती आम्ही देऊन तुम्ही नीट चौकशी करा.. तक्रारीचा सर्वांनाच अधिकार आहे. असे सांगून हे महाशय चढ्या आवाजात सिंहवाणीच कशी याप्रकरणी दोशी आहे, हे ठासून सांगण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
या तथाकथित प्राध्यापकाने आपल्या अकलेचे तारे तोडत एसीबीने या इनोसंट शिक्षकांवर चुकीची कारवाई केली आहे, लाच लुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस पैसे घेऊन अशी कारवाई कोणावरही करतात.. आणि केस मिटवण्यासाठी ही पैसे उकळतात.. एसीबी पोलिसांना मीडिया साथ देते.. आपल्या बातम्या छापून आपला टीआरपी वाढवतात.. आणि पैसेही उकळतात.. सर्वच यंत्रणा करप्ट झाली आहे.. लाचखोर प्रकरणात सापडलेल्या नार्वेकर या शिक्षकाला पोलिसांनी पकडले आहे पण जेव्हा कोर्ट त्याला शिक्षा देईल, तेव्हाच तुम्ही बातमी छापायला हवी.. त्यापूर्वी माध्यमांनी अशी बातमी छापायला नको.. असा मौलिक सल्लाही माध्यमांना दिला.
या त्याच्या वक्तव्यावर सिंहवाणीने त्यांना एसीबी माध्यमे आणि सर्वच यंत्रणावर योग्य त्या ठिकाणी तक्रारी करायचा सल्ला दिला. यावर हा तथाकथीत प्राध्यापक म्हणाला, मी नार्वेकर ला फोन करून माध्यमावर खटले दाखल करण्यास सांगणार आहे.
म्हणजे लाच यांनी खायची.. अँटी करप्शन च्या ट्रॅप मध्ये सापडायचे.. पोलिसांनी अटक करायचे.. यावेळी त्यांची बदनामी होत नाही. पण खापर मात्र माध्यमावर फोडायचे.. हा कुठला प्रकार आहे
तुम्हाला शोभत नाही
अशा प्रकारे तुम्ही वृत्त प्रसारित करता हे तुम्हाला शोभत नाही. तुम्हीही शिक्षण क्षेत्रात शिकला आहात. या क्षेत्राला बदनाम का करता. असा सल्ला देण्याचा प्रयत्न केला.
म्हणजे एकाने लाच खाली म्हणून सर्व क्षेत्र बदनाम होत नाही, सर्वत्र असे काही नमुने असतात, याची जाणीव यांना बहुतेक नसावी
त्या दाखल्यासाठीही पैसे घेतले जातात
महसूल खात्यात सह अन्य ठिकाणी दाखले देण्यासाठी पैसे घेतले जातात, अशावेळी माध्यमिक का बातमी देत नाहीत? असा सवाल या महाभागाने केला. त्यावर जनतेने आवाज उठवला तर त्यांचा आवाज माध्यमे बुलंद करतात तुम्ही आवाज उठवा, अशी सूचना करताच ते माझे काम नाही असे सांगत हात झटकून रिकामे झाले
प्रोफेसर, प्राध्यापक
हे महाशय आपण प्राध्यापक आहोत अशी ओळख करून देतात.. नावासमोर प्रोफेसर लिहितात. जिज्ञासा सिंहवाणीने त्यांना विचारले असता ते कुठल्यातरी जुनियर कॉलेजवर असल्याचे सांगतात. प्रोफेसर पद मिळवण्यासाठी काय करावे लागते, त्याची शैक्षणिक क्षमता, पदव्या काय असतात? याची माहिती त्यांना नसावी किंवा तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असावेत. म्हणूनच आम्ही या वृत्तांत त्यांना तथाकतीत प्राध्यापक असे संबोधले आहे
लाचखोराची बाजू मागणारा..
संबंधित लाचखोर शिक्षकाची माध्यमांकडे प्रभावी बाजू मांडणारा हा तथाकथित नीती मूल्यांच्या गप्पा सर्रास मारत होता. यावरूनच त्याची मूल्ये काय असावित हे लक्षात येते.
एसीबीची सापळा कारवाई
तक्रारदार एसीबी कडे तक्रार दाखल करायला गेल्यानंतर तक्रारदाराकडून सविस्तर माहिती घेतली जाते. त्यानंतर एफ आय आर केला जातो. ही तक्रार काय आहे.. कोणाविरुद्ध आहे?याची कल्पना फक्त एसीबीची संबंधित टीम आणि तक्रारदार यांनाच असते. एफ आय आर झाल्यानंतर तक्रारदारास कोणाशीही संपर्क साधू दिला जात नाही. त्यानंतर सापळा रचला जातो. सापळा कारवाईत रंगेहात पकडले गेलेले बहुतांशी सर्वच आरोपीना अटक केली जाते. क्वचित एखादा आरोपी पळून जाण्यात यशस्वी होतो.
सापळा कारवाई यशस्वी पूर्ण झाल्यावरच याची माहिती सर्वांना होते. त्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांमार्फत माध्यमांना ही माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारेच माध्यमे वृत्त प्रसारित करतात.
तक्रारदारास त्रास होऊ नये, आकसा पोटी त्याच्यावर कारवाई होऊ नये, म्हणून तक्रारदाराचे नाव वृत्तांमध्ये न देण्याची पध्दतीआहे.