भातशेती पुर्नलागण करताना श्री ( SRI ) पद्धतीचा अवलंब करावा. – शेती मित्र शरद देवेकर. भुदरगड मध्ये कृषी दिन उत्साह मध्ये साजरा.

भातशेती पुर्नलागण करताना श्री ( SRI ) पद्धतीचा अवलंब करावा.
– शेती मित्र शरद देवेकर.
भुदरगड मध्ये कृषी दिन उत्साह मध्ये साजरा.
सिंहवाणी ब्युरो /गारगोटी
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तालुका कृषी अधिकारी भुदरगड आणि पंचायत समिती भुदरगड यांच्या विद्यमाने कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कृषी विभागाच्या माध्यमातून हेक्टरी 125 मॅट्रिक टन ऊस उत्पादकता वाढ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच ऊस व भातपिक शेतीचे मार्गदर्शन वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्राप्त शरद देवेकर यांनी मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी डॉ.शेखर जाधव अध्यक्षस्थानी होते.
शेतीमित्र शरद देवेकर यांनी भातशेतीमध्ये श्री (SRI) पद्धत खूप महत्त्वाची आहे, हे सांगून. भाताची रोपे 15 ते 20 दिवसांची झाल्यावर पुर्नलागवड करावी. दोन रोपामध्ये 25 बाय 25 सेंटीमीटर अंतर ठेवावे. शेतात जास्त पाणी साठवू नये. सेंद्रिय खतांचा वापर करावा. खत नियोजनामध्ये युरियाचा वापर टाळून अमोनियम सल्फेटचा वापर करावा किंवा युरिया ब्रॅकेटचा वापर करावा. गिरीपुष्पाचा पाला गाडावा. ताग शेतामध्ये गाडुन चिखलणी करावी. तरच उत्पादन वाढेल. असे मार्गदर्शन केले.
भात पीक स्पर्धेच्या शेतकऱ्यांचा तसेच तालुक्यात जास्त बायोगॅस करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री ना् प्रकाश आबिटकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती पिकवली पाहिजे व अधिक उत्पादन घेतले पाहिजे असे आवर्जून सांगितले. कृषी दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला कृषि पर्यवेक्षक चव्हाण,डवरी,विस्तार अधिकारी बोटे,तालुका आत्मा समितीचे सदस्य, कृषि सहायक,कर्मचारी,शेतकरी उपस्थित होते. अभिजित पाटील विस्तार अधिकारी कृषी यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. सुशांत एकल सहायक गट विकास अधिकारी यांनी आभार मानले.