क्रीडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे, बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत वेदांग तावडे यांचे यश

पुणे, बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत वेदांग तावडे यांचे यश
सिंहवाणी ब्युरो / कोल्हापूर, : पुणे, बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय एम अँड फायर आर्म्स नेमबाजी स्पर्धेत आबिटकर ग्रुप ऑफ एज्युकेशनचा विद्यार्थी वेदांग तावडे याने यश मिळवले. या कामगिरीच्या जोरावर त्याची पुढील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेची पात्रता सिद्ध केली.
या स्पर्धेत ५० मीटर रायफल prone प्रकारात वेदांग याने ६०० पैकी ५३३ गुण मिळवले.
अखिल भारतीय जी. टोळी. मावळणकर आणि गोवा येथे होणाऱ्या खुल्या पश्चिम विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
आंतरराष्ट्रीय नेमबाज व प्रशिक्षक , श्री. रमेश कुसाळे , व श्री. तेजस कुसाळे तसेच त्याचे शिक्षक श्री. तुकाराम माने सर व प्राचार्य श्री.अर्जुन आबिटकर सर यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.