जिल्हाताज्या घडामोडी

सुदर्शन नगर मित्र मंडळ, गारगोटी यांचा गणेशोत्सव – सामाजिक व सांस्कृतिक व पर्यावरण पूरक उपक्रमांनी साजरा!

सुदर्शन नगर मित्र मंडळ, गारगोटी यांचा गणेशोत्सव – सामाजिक व सांस्कृतिक व पर्यावरण पूरक उपक्रमांनी साजरा!


सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव पुरस्काराने सन्मानित सुदर्शन नगर मित्र मंडळ, गारगोटी यांच्यातर्फे यंदाचा गणेशोत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण पूरक व धार्मिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
पहिल्या दिवशी झालेल्या आगमन सोहळ्याने उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली ज्यामध्ये लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्याच दिवशी सत्यनारायण महापूजनही पार पडले.

तिसऱ्या दिवशी चिखलापासून गणेशमूर्ती तयार करणे या उपक्रमाला मुलांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. रात्री महिलांसाठी खास होम मिनिस्टर स्पर्धा झाली .चौथ्या दिवशी रक्तदान शिबीर घेण्यात आले तसेच संध्याकाळी संगीत खुर्ची व फनी गेम्समुळे कार्यक्रमाला रंगत आली.

पाचव्या दिवशी भव्य सजीव देखावा सादर करण्यात आला. तर १ सप्टेंबर रोजी एक दिवस एक महोत्सव – वही महोत्सव साजरा करून गोळा झालेल्या वह्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्याच दिवशी महिलांसाठी पाककला स्पर्धा (मोदक) घेण्यात आली. रात्री लहान मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारावून टाकले.
२ सप्टेंबर रोजी नवसाच्या  राजाची महाआरती पार पडली. यावेळी दीपोत्सव, महिलांची महाआरती तसेच आकर्षक देखावे हे विशेष आकर्षण ठरले. रात्री स्मार्ट गेम व बक्षीस वितरण सोहळ्याने उत्सवाला सुंदर पूर्णविराम मिळाला.
३ सप्टेंबर रोजी भाविकांच्या उपस्थितीत ढोल  ताशा वाद्याच्या गजरात नवसाच्या गणपतीचे विसर्जन भक्तीभावाने संपन्न झाले.
सुदर्शन नगर मित्र मंडळ, गारगोटीचे हे सर्व उपक्रम समाजातील सर्व वयोगटांना एकत्र आणणारे, संस्कृती, कला पर्यावरण पूरक व सामाजिक जाणीवेचे दर्शन घडवणारे ठरले. मंडळाचे हे योगदान अनुकरणीय व प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button