क्राईमजिल्हाताज्या घडामोडी

चिकोत्रा सहकारी पतसंस्थेत १३ लाखांचा गैरव्यवहार; १२ जणांवर गुन्हा

चिकोत्रा सहकारी पतसंस्थेत १३ लाखांचा गैरव्यवहार; १२ जणांवर गुन्हा

सिंहवाणी ब्युरो / पिंपळगांव:
;पिंपळगाव (ता.भुदरगड) येथील चिकोत्रा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत तब्बल १३ लाख १६ हजार ४२० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी संस्थेचे पदाधिकारी व संचालक अशा बारा जणांविरुद्ध भुदरगड पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची फिर्याद अप्पर उपलेखापरीक्षक हरीबाई तांबडे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पिंपळगाव येथील चिकोत्रा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत सभासदांच्या ठेव रक्कमेचा अपहार झाला.तब्बल १३ लाख १६ हजार ४२० रुपयांचा अपहार झाला आहे.या अपहारामध्ये संशयित संस्थेची क्लार्क मनिषा एकनाथ हसुरे (पिंपळगाव,ता.भुदरगड) व्यवस्थापक कमल संभाजी जाधव (रा झुलपेवाडी ता.आजरा) आणि आठ संचालक,दोन लेखापाल असे एकूण बारा संशयितानी ठेवीदार आणि सभासदांचा विश्वासघात करून फसवणूक केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.संशयित आरोपीं पुढील प्रमाणे आठ संचालक, प्रमाणित लेखापरीक्षक पुरुषोत्तम नारायण जाधव(रा.भादोले,ता.हातकणंगले),सनदी लेखापाल बापूसाहेब जी.पाटील,(रा. राजारामपुरी,कोल्हापूर)
या प्रकरणाचा पुढील तपास भुदरगड पोलीस करत आहेत.संपूर्ण घोटाळ्याचे स्वरूप व जबाबदारांची जबाबदारी निश्चित करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button