‘ दुधगंगा वेदगंगा ‘ चे ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : अध्यक्ष के. पी. पाटील :बिद्री साखर कारखाना व डिस्टीलरीचा बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा

‘ दुधगंगा वेदगंगा ‘ चे ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
: अध्यक्ष के. पी. पाटील
बिद्री साखर कारखाना
व डिस्टीलरीचा बॉयलर अग्नी प्रदिपन सोहळा
सिंहवाणी ब्युरो / बिद्री :
सन २०२५-२६ च्या चालू गळीत हंगामात बिद्री साखर कारखान्याने तब्बल ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार व कारखाना व्यवस्थापनाने सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. बिद्री (ता. कागल) येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम व डिस्टिलरी प्रकल्पाच्या ४ थ्या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभात ते बोलत होते.
यावेळी अध्यक्ष के. पी. पाटील व त्यांच्या पत्नी सौ. मायादेवी पाटील या उभयंतांच्या हस्ते तर डिस्टलरी विभागाकडे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे व त्यांच्या पत्नी सौ. रोशनी फराकटे या उभयतांच्या हस्ते विधीवत पूजन करुन बॉयलर अग्नी प्रदिपन केले. अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील सहकारी साखर उद्योगासमोर उत्पादनातील अनिश्चितता, आर्थिक बोजा, बाजारपेठेतील अस्थिरता आणि ऊसतोडणी मजूरांचा तुटवडा ही मोठी आव्हाने आहेत. त्यातच अवेळी पडणारा पाऊस आणि ऊस लागवडीतील घट यामुळे साखर उत्पादनात चढउतार होत आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेच्या किमतीत अस्थिरता असल्याने निर्यात घटली आहे. या हंगामात ऊस उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
ते म्हणाले, सर्वांच्या योगदानामुळे बिद्री साखर कारखाना यशाची भरारी घेत असूनमागील काळात राज्यातील सर्वाधिक एफआरपी (FRP) देणारा अग्रगण्य कारखाना म्हणून बिद्रीने नावलौकिक मिळवला आहे. हीच परंपरा आगामी हंगामात कायम ठेवण्याचा कारखान्याचा निर्धार असून, शेतकऱ्यांना उच्चांकी ऊसदर मिळावा यासाठी आवश्यक प्रयत्न केले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे अनेक संकटे येवूनदेखील हा कारखाना यशस्वी वाटचाल करत आहे. साखर कारखान्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कष्टाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या श्रमांचा सन्मान राखत त्यांना काहीही कमी पडू दिले जाणार नाही.
कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी स्वागत केले. कार्यक्रमास संचालक प्रविणसिंह पाटील, सुनिलराज सुर्यवंशी, धनाजीराव देसाई, राजेंद्र पाटील, पंडितराव केणे, उमेश भोईटे, मधुकरअप्पा देसाई, के. ना. पाटील, सत्यजित जाधव, राहुल देसाई, राजेंद्र मोरे, डी. एस. पाटील, रंगराव पाटील, दीपक किल्लेदार, रविंद्र पाटील, संभाजी पाटील, राजेंद्र भाटले, रणजित मुडुकशिवाले, फिरोजखान पाटील, रामचंद्र कांबळे, फत्तेसिंग पाटील, भुषण पाटील, जीवन पाटील, रावसाहेब खिलारी, सौ. क्रांती उर्फ अरुंधती संदिप पाटील, सौ. रंजना आप्पासो पाटील, संदिप पाटील, आप्पासो पाटील, कामगार प्रतिनिधी शिवाजी केसरकर, राजेंद्र पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई यांच्यासह सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.