कृषीवार्ताजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

झेंडु लागवडीतुन २० गुंठ्यामध्ये दिड लाखाचे उत्पादन.: शेतीमित्र शरद देवेकरांचे मार्गदर्शन

झेंडु लागवडीतुन २० गुंठ्यामध्ये दिड लाखाचे उत्पादन.
शेतीमित्र शरद देवेकरांचे मार्गदर्शन

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
सध्या तरुण शेतकरी शेतीत काम न करता शहरात नोकरीसाठी वाट धरत असल्याचं चित्र आहे. पिकाला योग्य भाव मिळत नाही म्हणुन अनेक शेतकरी कर्ज घेऊन शेती करतात. मात्र आपल्या मालाला भाव नाही, घेतलेलं कर्ज फिटत नाही यातच मुलींचे लग्न मुलांचा शिक्षण संसार का झाला कसा चालवायचा ? बँका देखील कर्ज देत नाही म्हणून अनेक शेतकरी सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडल्याचं बघायला मिळत आहे. अशा अनेक प्रश्नांमुळे शेतकरी व तरुण चिंतेत आहेत. त्यामुळे तरुण मुलं शेती न करता शहरात येत असल्याचं चित्र आहे. मात्र याला अपवाद ठरत आहे तो कणकवली तालुक्यातील दारूम येथील 20 गुंठे क्षेत्रात संग्राम पाटील याने शेतीतच नवा प्रयोग करत प्रगतीचा मार्ग दाखवला आहे. या प्रयोगासाठी शेतीमित्र महाराष्ट्र शासन श्री. शरद देवेकरांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूर मधील बसरेवाडी ता.भुदरगड येथील संग्राम पाटील हे गेली 15 वर्ष कणकवली तालुक्यातील दारूम गावडेवाडी येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी येथील वीस गुंठे क्षेत्र करार नाम्याने शेती करण्यासाठी घेतले आहे. यामध्ये उन्हाळी कलिंगड लागवड आणि पावसाळ्यामध्ये झेंडूची लागवड अशी दोन पिके घेण्यात येतात. यामध्ये झेंडूची शेती मधून दीड लाख रुपये उत्पन्न येणार असल्याचे श्री संग्राम पाटील यांनी सांगितले.खाजगी नोकरी सोबतच शेती करण्याची पाटील यांना खूपच आवड आहे. कलकत्ता आणि युकियेलो या दोन जातीची झेंडूची लागवड केली असून दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये झेंडूची खूपच मागणी असते या हंगामातच गेली आठ वर्ष ते झेंडूची शेती करत आहेत. झेंडूची लागवड केल्यावर रोगाची लक्षणे दिसू लागली की तात्काळ मार्गदर्शक सल्ल्यानुसार कीटकनाशक औषधांची फवारणी करावी लागते.सोबत ड्रिपद्वारे पाणी आणि खताचे डोस द्यावे लागतात. त्यामुळे झाडांची क्वालिटी फुलांची भरणी वजनदार फुल येतात. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली आहे एकूण पन्नास हजार रुपये खर्च आला असून खर्च वजा जाता एक लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.यामध्ये त्यांना मदत करण्यासाठी त्याच्या कुटुंबातील पत्नी दोन मुली व मुलगा मदत करत असतात.
सध्या ते डॉ .डी वाय पाटील सहकारी साखर कारखाना वेसरफ पळसंबे ऑफिस कासार्डे येथे शेती मदतनीस या पदावर काम करत आहेत. तरीदेखील त्यांनी सध्याच्या महागाईच्या कालखंडात शेती शिवाय पर्याय नाही हे त्यांनी आजच्या तरुण पिढी युवा वर्गाला दाखवून दिले आहे.त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी हताश न होता आधुनिक शेतीकडे तरुण युवा शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे ,निराश न होता, आत्महत्या न करता आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत योग्य मार्गदर्शनाखाली शेती करावी असे यावेळी यशस्वी शेतकरी संग्राम शंकर पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button