बिद्री’ची पहिली उचल विनाकपात ३,४५२ रु.: परंपरेनुसार अंतिम ऊस दर उच्चांकीच असेल : अध्यक्ष के. पी. पाटील

लै भरी बिद्री’ची पहिली उचल विनाकपात ३,४५२ रु.:
परंपरेनुसार अंतिम ऊस दर उच्चांकीच असेल : अध्यक्ष के. पी. पाटील
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
येथील दूधगंगा – वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५ – २६ या गाळप हंगामासाठी प्रतिटन ३,४५२ रुपयांप्रमाणे विनाकपात पहिली उचल देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली. दिलेली पहिली उचल हा अंतिम ऊस दर नाही, असेही त्यांनी सांगितले. कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘बिद्री’ने पाटील म्हणाले, नेहमीच काटकसरीचे धोरण अवलंबून, शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. हंगाम समाप्तीनंतर सरकारच्या नियमाप्रमाणे सरासरी साखर उताऱ्यानुसार शेतकऱ्यांना अंतिम ऊस दर दिला जाईल. कारखान्याने सर्व देणी वेळेवर भागवून शेतकरी, व्यापारी, कर्मचारी, सभासद यांचा विश्वास जपला आहे.
ते म्हणाले, विस्तारीकरणानंतर कारखाना प्रतिदिन ८ हजार ५०० टन क्षमतेने ऊस गाळप करण्यास सज्ज आहे. कारखाना व्यवस्थापनाने ठरविलेले १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक मंडळातील सर्व सदस्य, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे, तसेच सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
परंपरेनुसार बिद्री कारखान्याचा उच्चांकी दर कायम राहील,
के. पी. पाटील म्हणाले, यावर्षी ऊसाची होणारी उपलब्धता कीड व रोग तसेच पावसामुळे झालेले नुकसान आणि एकूण हंगाम काळात मिळणारा साखर उतारा या सगळ्याचा विचार करून उसाचा अंतिम दर ठरेल. यापूर्वी व यावर्षीदेखील परंपरेनुसार बिद्री कारखान्याचा उच्चांकी दर कायम राहील, असा विश्वास वाटतो. त्यातच गतसालच्या हिशेबाने दर द्यायचा की यावर्षीच्या उताऱ्याप्रमाणे, याबाबत निर्णय झालेला नाही,