ब्राझीलियन मॉडेलने केले भारतात 22 वेळा मतदान? राहुल गांधींचा स्फोटक दावा, हाऊस नंबर झिरोच्या थिअरीचं धक्कादायक सत्य उघडं पाडलं

ब्राझीलियन मॉडेलने केले भारतात 22 वेळा मतदान? राहुल गांधींचा स्फोटक दावा,
हाऊस नंबर झिरोच्या थिअरीचं धक्कादायक सत्य उघडं पाडलं
वृत्तसेवा / नवी दिल्ली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी हरियाणातील विधानसभा निवडणुकीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर नवा बॉम्ब टाकला. यावेळी देशाला थक्क करणारी एक बाब राहुल गांधी यांनी सांगितली. एका ब्राझील मॉडेलनं हरियाणात 22 वेळा मतदान केल्याचं राहुल यांनी प्रेझेंटेशनमधून दाखवून दिलं.
मोठ्या स्क्रिनवर प्रेझेंटेशन देताना राहुल गांधी यांनी सांगितलं की, “ब्राझील मॉडेलनं हरियाणात 10 वेळा मतदान केलं. हरियाणा विधानसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराने काहीतरी चुकीचं असल्याचं सांगितलं होतं. या मॉडेलनं कधी स्वीटी म्हणून तर कधी सीमा म्हणून मतदान केलंय.” तसेच, राहुल गांधी यांनी दावा केला की, हरियाणात 25 लाख मतं चोरीला गेलीत.
राहुल गांधींनी आणखी एक दावा केलाय. ते म्हणाले की, त्याच महिलेचं नाव बूथवर 223 वेळा आलं. निवडणूक आयोगानं त्या महिलेनं किती वेळा मतदान केलंय याचं उत्तर द्यावं. एका मुलीनं 10 ठिकाणी मतदान केलं. बनावट फोटो असलेले 1,24,177 मतदार होते. मतदार यादीत नऊ ठिकाणी एका महिलेनं मतदान केलं. राहुल गांधी म्हणाले की, यामागील हेतू स्पष्ट होता. भाजपला मदत करणं. ही मतदान चोरी लोकांना दिसली पाहिजे. यासाठी निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजेत. म्हणूनच सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलं.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, “भारतातील तरुणांनी, GenZ यांनी हे स्पष्टपणे समजून घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. कारण हे तुमच्या भविष्याबद्दल आहे. मी निवडणूक आयोगावर, भारतातील लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय, म्हणून मी 100% पुराव्यांसह हे सादर करतोय. आम्हाला खात्री आहे की, काँग्रेसच्या प्रचंड विजयाचं पराभवात रूपांतर करण्यासाठी एक योजना आखण्यात आली होती. कृपया त्यांच्या (मुख्यमंत्री नायब सैनी) चेहऱ्यावरील हास्य आणि हरियाणाचे मुख्यमंत्री ज्या ‘व्यवस्थे’बद्दल बोलत आहेत, त्याकडे लक्ष द्या…”
आमच्याकडे ‘H’ फाईल्स : राहुल गांधी
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलंय की, “आमच्याकडे ‘H’ फाईल्स आहेत, हे संपूर्ण राज्यात मतदान चोरी कशी झाली, याबद्दल आहे. आम्हाला शंका होती की, हे केवळ वैयक्तिक मतदारसंघांमध्येच नाही तर, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घडलंय. हरियाणामधील आमच्या उमेदवारांकडून आम्हाला असंख्य तक्रारी आल्या की, काहीतरी चूक आहे आणि ते काम करत नाही. त्यांचे सर्व अंदाज उलटे निघालेत…” आम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात हे अनुभवलं होतं, पण आम्ही हरियाणावर लक्ष केंद्रीत करण्याचा आणि तिथे काय घडलंय, याचा तपशीलवार शोध घेण्याचा निर्णय घेतला.
राहुल गांधींनी , म्हणाले, ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार खोटारडे’
ज्या मतदारांच्या घराचा क्रमांक शून्य आहे, ते मतदार हे बेघर आहेत, हा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी बुधवारी नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदार यादीतील घोळाचे धक्कादायक पुरावे प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशात तब्बल 93 हजार बेघर मतदार असल्याचे म्हटले होते. या मतदारांकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नसल्याने त्यांचा पत्ता लिहताना घराचा क्रमांक 0 लिहला जातो, असे स्पष्टीकरण ज्ञानेश कुमार यांनी दिले होते. मात्र, राहुल गांधी यांनी हे सर्व दावे खोडून काढले.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणतात की, काही लोकांकडे घर नसतं पण ज्यांचं नाव मतदार यादीत असते. या व्यक्ती रात्री जिथे झोपतात ती जागा यांचा पत्ता असतो. मग ही जागा रस्त्याच्या कडेला, पुलाखाली किंवा दिव्याखाली असू शकते. या लोकांचा पत्ता हाऊस नंबर 0 असा असतो, असे ज्ञानेश कुमार यांनी म्हटले होते. आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या या दाव्याची पडताळणी केली. तेव्हा हरियाणातील हाऊस नंबर 0 पत्ता असणाऱ्या मतदाराची ओळख पटली. मात्र, गावात या व्यक्तीचे मोठे घर होते. हाऊस नंबर 0 पत्ता असलेले हे मतदार निवडणूक झाल्यानंतर सापडत नाहीत. मतदान होताच हे सगळेजण गायब होतात, त्यांना शोधणे अवघड असते. त्यामुळे ज्ञानेश कुमार खोटं बोलत आहेत. मतदार यादीतील ही गोष्ट चूक नाही, तर जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे. मतदार यादीतील बेघर व्यक्तींचे कपडे पाहून ते बेघर नाहीत, हे स्पष्टपणे लक्षातही येते, असे राहुल गांधी यांनी म्हटले.