क्रीडाजिल्हाताज्या घडामोडी

कर्मवीर हिरे महाविद्यालयात १८ व १९ नोव्हेंबर रोजी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय हॉली बॉल स्पर्धा”

कर्मवीर हिरे महाविद्यालयात १८ व १९ नोव्हेंबर रोजी


शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय हॉली बॉल स्पर्धा”

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
येथील श्री मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी यांच्या वतीने आयोजित केली जाणारी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत आंतर विभागीय हॉलीबॉल स्पर्धा दिनांक १८ व १९ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असून स्पर्धेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सातारा, कोल्हापूर आणि सांगली या तीन जिल्ह्यांतील नामांकित महाविद्यालयांचे संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातून सहभागी होणारे संघ
1. दहिवडी कॉलेज, दहिवडी
2. मुधोजी कॉलेज, फलटण
3. आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज, नागठाणे
4. दौलतराव आहेर कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, कराड
कोल्हापूर जिल्ह्यातून सहभागी होणारे संघ
1. अण्णासाहेब डांगे कॉलेज, हातकणंगले
2. सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड
3. विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर
4. देवचंद कॉलेज, अर्जुननगर
सांगली जिल्ह्यातून सहभागी होणारे संघ
1. विलिंग्डन महाविद्यालय, सांगली
2. के. बी. पी. कॉलेज, इस्लामपूर
3. अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, आष्ठा
4. सी. आय. एम. डी. आर. कॉलेज, सांगली
महाविद्यालयाच्या क्रीडांगणाची सजावट, सामन्यांचे वेळापत्रक, पंचांची निवड तसेच आवश्यक सुविधा यांची तयारी जोरात सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून दोन्ही दिवसांच्या सामन्यांना मोठी उपस्थिती लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार, संघभावना आणि आरोग्यदायी स्पर्धात्मकता वाढविण्यास निश्चितच मदत करेल, असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. उदयकुमार शिंदे व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सचिन चौगले यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button