क्राईमजिल्हाताज्या घडामोडी

कुर ता. भुदरगड अपघात: ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार

कुर ता. भुदरगड अपघात:
ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार

सिंहवाणी ब्युरो / कुर
कूर (ता. भुदरगड) येथे ट्रकने पाठीमागील बाजूने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.
मितेश रविंद्र टेंबे (वय ४१, सध्या रा- राजारामपूरी १० वी गल्ली कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. अपघाताची भुदरगड पोलिसांत नोंद झाली. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

घटना सथळावरुन मिळालेली अपघाताची माहिती अशी : कूर येथील ग्रीन टेक रेडी मिक्स काँक्रीट कारखान्यासमोर आज दुपारी मितेश रविंद्र टेंबे मोटारसायकलवरून (एम एच ०९ जी जी ८२६४) जात होते. यावेळी पाठीमागील बाजूने आलेल्या ट्रकने (एम एच ११ ए एल ७५०७) धडक दिली. यामुळे मोटारसायकलवरून पडून ते जागीच ठार झाले. याप्रकरणी चालक संजय राजाराम देसाई (रा. नाधवडे ता. भुदरगड) याच्यावर गुन्हा दाखल झाला.
गौरव सूर्यकांत कुलकर्णी यांनी याबाबतची फिर्याद दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button