ताज्या घडामोडीदेश विदेश

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना गंभीर आरोपांसाठी मृत्युदंडाची शिक्षा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना गंभीर आरोपांसाठी मृत्युदंडाची शिक्षा :

वृत्तसंस्था / ढाका :
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांग्लादेशच्या इंटरनॅशनल कोर्टाने मानवतेविरोधातील गुन्ह्यांत दोषी ठरवले असून त्यांना मृत्यु दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने 2025 मध्ये दिला असून त्याचा मूळ आधार 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरुद्ध सरकारने केला हिंसक आंदोलनात झालेला नरसंहार आहे. त्या काळात आंदोलकांवर अत्याचार करून अनेक मृत्युमुखी पडले होते ,यावर संयुक्त राष्ट्रांनीसुद्धा गंभीर चिंता व्यक्त केली होती.शेख हसीना आणि माजी गृहमंत्री असदुज्जमान खान यांना या प्रकरणात त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवला गेला आहे कारण ते सध्या भारतात निर्वासित आहेत. बांगलादेश सरकारने आता भारताला शेख हसीनांना परत पाठवण्याची मागणी केली आहे, मात्र भारत सरकार याबाबत निर्णय घेताना मानवी हक्क, न्यायप्रणालीची पारदर्शकता आणि देशातील राजकीय परिस्थिती यांचा विचार करेल. अशा खटल्यांमध्ये प्रत्यार्पण म्हणजेच आरोपी परत पाठवण्याची प्रक्रिया अनेकदा राजकीय आणि इतर महत्वाच्या दृष्टिकोनातून तपासली जाते.या निर्णयामुळे बांगलादेशात सध्या राजकीय वादळ उठले असून विरोधकांनी न्यायालयावर पक्षपाताचा आरोप केला आहे. शेख हसीना यांच्या पक्षीयांनी विशेष न्यायाधिकरणाला “कांगारू कोर्ट” म्हणत निषेध नोंदवला आहे. बांगलादेशमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून, देशात मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवले जात आहे.भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रत्यार्पण करारानुसार, अशा प्रकरणात आरोपी परत पाठवण्याचा निर्णय संपूर्ण तपासणीनंतरच होतो. त्यामुळे शेख हसीना यांना भारतातून बांगलादेशात परत पाठवायचे की नाही, हे प्रश्न अद्याप ठरलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button