निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोड! शिवसेनेच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी

निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोड!
शिवसेनेच्या मंत्र्यांची मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी
सिंहवाणी ब्युरो / मुंबई :
आगामी निवडणुकांच्या
तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळजनक घडामोडी घडत आहेत. महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री नाराज आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. महायुती कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व मंत्र्यांनी दांडी मारली. या बैठकीला फक्त उपमुख्यमंत्री शिंदे एकटेच उपस्थित होते. एकनाथ शिंदे एकटं सोडून शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटले. शिंदेचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
शिवसेना-भाजपमधील वाढत्या तणावाचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. मित्रपक्षातच सुरु असलेल्या ऑपरेशन लोटसमुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीकडे पाठ फिरवल्याचं बोललं जातंय. याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले. फडणवीसांकडे या सर्व मंत्र्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना मंत्र्यांच्या बैठकीची माहिती माध्यमाना मिळाली डोंबिवलीतील पक्षप्रवेशावर शिवसेनेनं फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा असे तिन्ही पक्ष एकत्रितपणे सत्तेवर आहेत. मागील काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री वेगवेगळ्या कारणावरून नाराज असल्याचे दिसत आहे. विशेषतः निधीवाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे यांच्या मंत्र्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे. याधी वाटपावरून शिंदे आणि भाजपाचे नेते यांच्यात अनेकदा खटके देखील उडाले आहेत. शिंदेंच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर थेट बहिष्कार घातला. या बैठकीला सरकारमधील सर्वच मंत्री उपस्थित होते फक्त शिंदेंचे सर्वच मंत्री गैरहजर होते. सर्वच मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवरून चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र शिवसेनेचा एकही मंत्री बैठकीला नसल्यामळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे