कृषीवार्ताजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिद्रीचे २८ दिवसांत २ लाख ८ हजार ३४० मे.टन ऊस गाळप : के. पी. पाटील पहिल्या पंधरवड्यातील ऊस गाळपाचे

बिद्रीचे २८ दिवसांत २ लाख ८ हजार ३४० मे.टन ऊस गाळप : के. पी. पाटील

पहिल्या पंधरवड्यातील ऊस गाळपाचे .
प्रतिटन ३६१४ रुपये बिल जमा

सिंहवाणी ब्युरो / बिद्री:
बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री यांनी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातील ऊस गाळपाचे बिल जमा केला आहे.
प्रतिटन ३६१४ रुपये प्रमाणे देय असलेली सर्व ऊस बिलाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात एकूण १,०२,२७२ मे. टन उसाचे गाळप झाले असून, याची प्रतिटन ३६१४ रुपये प्रमाणे बिले जमा करण्यात आली आहेत.

बिलाची एकूण रक्कम ३६ कोटी ९६ लाख ११ हजार १६९ रुपये इतकी रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.

ज्या ऊस उत्पादकांनी या पंधरवड्यात ऊसपुरवठा केला आहे, त्यांनी आपापल्या संबंधित बँकांशी संपर्क साधून आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेची खात्री करून घ्यावी.



आजअखेर फक्त २८ दिवसांत २ लाख ८ हजार ३४० मे.टन ऊस गाळप करण्यात आला असून, त्यातून २ लाख २२ हजार २०० साखर पोती उत्पादित झाली आहेत.


यंदाचा सरासरी साखर उतारा १०.८५ टक्के इतका समाधानकारक आहे. कारखाना सुरळीत व पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, दररोज सरासरी ८,००० मे. टन ऊसगाळप सुरू आहे.

गळिताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व सभासद आणि शेतकरी बांधवांनी पिकविलेला सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button