विधानसभेत चंदगडच्या जनतेने परिवर्तन घडविले त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घडवावे – मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

विधानसभेत चंदगडच्या जनतेने परिवर्तन घडविले त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत घडवावे
– मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
सिंहवाणी ब्युरो / चंदगड :–
संविधानाने लोकशाही दिली आणि आपल्यावर जबाबदार टाकली व मुलभूत अधिकार दिले.पूर्वी राणीच्या पोटी राजा जन्माला यायचा आता लोकशाहीत मतदार हा राजा असतो राजेशाही आता लोप पावली आहे विकास कामे महायुतीने मार्गी लावली आहेत कोणतीही सत्ता नसताना शिवा भाऊ यांना आम्ही 400 कोटी निधी दिला त्यामुळे शिवाजीराव पाटील यांनी विकास कामे मार्गी लावली त्यातून चंदगडच्या जनतेने विधानसभेत परिवर्तन घडविले त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपा प्रणित आघाडीला बहुमत द्यावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी चंदगड येथे मेळाव्यात केले.
त्या मेळाव्यात मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, आमदार अमल महाडिक, माजी आमदार संजय बाबा घाटगे ,विनायक ऊर्फ पाटील गिरीजादेवी शिंदे, नेसरीकर आदी प्रमुख उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, चंदगड आजरा गडहिंग्लज हा आपल्या महाराष्ट्राचा सीमा भागा शेजारी आहे या भागाचा विकास व्हायचा असेल तर कुठल्यातरी लुंग्या सुंग्याच्या हाती न देता काम करणाऱ्या माणसाच्या हातात सत्ता द्या तरच विकासाची स्वप्ने पूर्ण होतील. गेल्या 60 वर्षात केंद्रातील आणि राज्यातील सरकार शिक्षण आरोग्य अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण सारखे कामे करण्यात अपयशी ठरले गावच्या तरुणाने उद्योगधंद्यासाठी शहराकडे धाव घेतली शहरातील वाढती संख्या आणि तेथील प्रदूषित पाणी घनकचरा गटारी त्या कारणामुळे शहरात अनेक प्रश्न निर्माण झाले. शहराचा अनेक समस्या निर्माण झाल्या.विकास खुंटला. २०१४ साली मोदी पंतप्रधान झाले.आणि महायुतीच्या माध्यमातून शिक्षण,आरोग्य, पाणी योजना, स्वच्छ भारत, स्मार्ट सिटी, अमृत योजनाआदी हजारो कोटीच्या योजना राबविल्या.
लाडकी बहिण योजना राबवून आज वर्ष पूर्ण झाले. विरोधकानी ती योजना निवडणुका झाल्यानंतर भाजप सरकार बंद करणार असा डांगोरा पिटला. परंतु ती योजना आता लाडकी बहीणच नव्हे तर लखपती दीदी योजना म्हणून सुरू करणार असल्याचे फडणवीस यांनी वेळी सांगितले. तेव्हा लाडक्या बहिणीनी टाळ्या वाजवून दाद दिली.
चंदगड तालुक्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग होऊ नये म्हणून विरोधकानी मोर्चा काढला परंतु शिवाजी पाटलांच्या आग्रहामुळे दुसरे कडे जाणारा निधी मी या शक्तीपीठ महामार्ग कडे लावून 90 हजार कोटीचा हा निधी या मार्गासाठी लावला आहे चंदगड तालुक्यात लॉजिस्टिक पार्क एमआयडीसी करणार आहे तसेच शिवा भाऊ हा माझ्यासाठी कोरा बेअरर चेक आहे त्यानी एक एक मागणी माझ्याकडे मागितली तरी ती मी पूर्ण करणारच असे अभिवचन यावेळी फडणवीस यांनी दिले.
आम्ही केवळ आश्वासने देणारे नाही तर ते पूर्ण करणारे आहोत. आरोग्य, शिक्षण, तसेच शेतकऱ्यांची काही प्रलंबित प्रकरणे त्यांना न्याय मिळवून देणे हे आमचं काम आहे प्रत्येक माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविणार त्यासाठी तुमची साथ महत्त्वाचे आहे चंदगड शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उद्या होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी करावे असे आवाहन शेवटी फडणवीस यांनी केले.
प्रारंभी शाहू, फुले , डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत नाथाजी पाटील यांनी केले. प्रास्ताविक दिग्विजय देसाई यांनी केले. महेश जाधव, खासदार धनंजय महाडिक, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील काणेकर, आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या भाषणात भाजपने केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.