बहिणीसोबत असलेल्या प्रेम संबंधा मुळे बापाने व भावाने मिळून केली गोळी झाडून तरुणाची हत्या : 21 व्या शतकातही महाराष्ट्रात सुरू आहे मोठा जातीयवाद

बहिणीसोबत असलेल्या प्रेम संबंधा मुळे बापाने व भावाने मिळून केली गोळी झाडून तरुणाची हत्या
21 व्या शतकातही महाराष्ट्रात सुरू आहे मोठा जातीयवाद
सिंहवाणी ब्युरो / महेश गायकवाड, सोलापूर
बहिणीसोबत असलेल्या प्रेम संबंधा मुळे बापाने व भावाने मिळून बौद्ध समाजातील तरुणाची निघृण हत्या केली आहे
21 व्या शतकात ही महाराष्ट्रात मोठा जातीयवाद सुरू असल्याचे या हत्येवरून दिसून आले
प्रेम संबंधाच्या कारणावरून झालेल्या वादातून गुरुवारी सायंकाळी बौद्ध समाजातील एका तरुणाचा गोळी झाडून व डोक्यात फरशी घालून निर्घृण खून करण्यात आला. दरम्यान, आमच्या प्रेमास विरोध करून वडील व भावांनी त्याला संपविले. असे असले तरी मी लग्न करून कायम त्याचीच राहीन, असे म्हणत प्रेयसीने चक्क बौद्ध समाजातील मृत युवकाच्या मृत देहासोबत लग्न केले आहे. प्रियकराला मारून कुटुंब हरले व त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून मी जिंकल्याची भावना मुलीने व्यक्त केली आहे.
सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन’; असा ठाम विश्वास या वेळी मुलीने बोलून दाखवला
प्रेमप्रकरणाचा मनाला चटका लावणारा शेवट झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी हळ हळ व्यक्त केली जात आहे.
माझ्या घरचे सक्षमची गेम टाकण्याचं प्लॅनिंग करत होते, तीन गोळ्या लागल्या तरी त्याला काही झालं नाही मग त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला ठार मारण्यात आले.असे अंचल या तरुणीने म्हटले आहे.
एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रातील जातीभेद किती विखारी स्वरुपाचा आहे, याचे प्रत्यंतर गुरुवारी नांदेडमध्ये आले. नांदेडच्या मिलिंद नगर इटवारा परिसरात सक्षम ताटे (वय 20) या बौद्ध समाजातील तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सक्षम ताटे याचे आंचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. याच वादातून आंचल मामीडवार हिचे वडील गजानन मामीडवार आणि भाऊ हिमेश मामीडवार व साहिल मामीडवार यांनी सक्षम ताटे याची डोक्यात फरशी व दगड घालून हत्या केली आहे . या घटनेनंतर आंचल मामीडवार या तरुणीने केलेली कृती राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आंचल मामीडवार हिने आपला प्रियकर सक्षमचा मृतदेह घरी आणल्यानंतर त्याच्यासोबत लग्नाचे काही विधी पार पडले. या दोघांच्याही अंगाला हळद लावण्यात आली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले. सक्षम ताटे याच्या अंत्यसंस्काराचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सक्षम ताटे आणि आंचल मामीडवार या दोघांचीही कौटुंबिक पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची होती. सक्षम आणि आंचल हे वयाने लहान असल्याने त्यांचे प्रेमप्रकरण, त्यांची समज आणि आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न करण्याचा निर्णय याविषयी अनेक परस्परविरोधी मतं व्यक्त होताना दिसत आहेत. परंतु, या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील जातीभेदाचा विखार अजूनही किती भयंकर स्वरुपाचा आहे, ही बाब नजरेआड करता येणार नाही.
या सगळ्या घटनेविषयी आंचल मामीडवार हिने सिंहवाणी प्रतिनिधी शी संवाद साधला. यावेळी तिने म्हटले की, गेल्या तीन वर्षांपासून सक्षम आणि माझे प्रेमसंबंध होते. ते आमच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यामुळेच त्यांनीच सक्षमचा घात केला. माझे वडील गजानन मामीडवार, हिमेश मामीडवार आणि साहिल मामीडवार यांनी सक्षमची हत्या केली. सक्षम याच्यावर एमपीडीए मध्ये कारवाई झाली होती. तो जेलमधून सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याची गेम टाकण्याच्या मार्गावर होते. ते मला धमकी देत होते की, आम्ही सक्षमला मारुन टाकणार. त्यांनी सक्षमला गोड बोलून इटवारा परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर नशा करुन त्याला मारले. सक्षमवर तीन गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही. मग त्याच्या डोक्यात फरशी टाकून त्याला मारले, असे आंचल मामीडवार हिने सांगितले.
आमचं प्रेम होतं. पण माझ्या पप्पांना आम्हा दोघांची जात वेगळी असल्यामुळे ते मंजूर नव्हतं. ते म्हणायचे, दुसरं कोणाशीही बोल मी लग्न लावून देतो. सक्षम बौद्ध होता, आम्ही पद्मशाली समाजाचे आहोत. जात वेगळी असल्यामुळेच माझ्या घरच्यांनी सक्षमला संपवले. आमच्या प्रेमसंबंधामुळेच त्याला मारण्यात आले. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे आंचल मामीडवार हिने म्हटले.
मी आयुष्यभर सक्षमसोबतच राहीन: आंचल
सक्षम ताटे याचा मृतदेह त्याच्या घरी आणण्यात आला होता तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराची मोठी गर्दी झाली होती. सक्षमचा मृतदेह पाहताच त्याच्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. सक्षमच्या मृतदेहाला आणि आंचलच्या अंगाला हळद लावण्यात आली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या नावाने कपाळावर कुंकू लावले. यानंतर तिने म्हटले की, मी सक्षमसोबत लग्न केले आहे. तो आता नसला तरी आमचं प्रेम जिवंत आहे. मी मनाने कायम त्याच्यासोबत राहीन. मी आता सक्षमच्या घरीच राहणार आहे, मला सक्षमसोबतच राहायचे आहे, असे आंचल मामीडवार हिने सांगितले.
महाराष्ट्रातील जातीभेदाचा विखार अजूनही किती भयंकर स्वरुपाचा आहे, ही बाब नजरेआड करता येणार नाही. 21 व्या शतकात ही महाराष्ट्रात मोठा जातीयवाद सुरू असल्याचे या हत्येच्या घटने वरून दिसून येते.
जातीय विखारातून वडिलांनी मुलीच्या प्रियकराला संपवलं आहे परंतु, प्रेयसीने मृतदेहाशी लग्न करून मोठा आदर्श निर्माण केला आहे, मृत तरुणाच्या प्रेयशी ने स्वतःच्या अंगाला हळद लावली अन् कपाळावर कुंकू भरले आणि म्हणाली माझे वडील भाऊ हरले परंतु सक्षम जिवंत आहे तो विजयी झाला आहे.