भाटिवडेच्या उपसरपंचपदी सौ.प्राजक्ता माणगावकर

भाटिवडेच्या उपसरपंचपदी सौ.प्राजक्ता माणगावकर
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
भाटिवडे (ता.भुदरगड) येथील ग्राम पंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.प्राजक्ता उत्तम माणगावकर यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मीना महेश कांबळे होत्या.
सन २०२२ मध्ये या ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. त्यामध्ये सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती . सरपंचपद हे मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे उपसरपंच पदाची संधी देण्याचे ठरले होते. त्यानुसार आज रोजी सौ. माणगावकर यांची चौथ्या वर्षी उपसरपंचपदाची संधी मिळाली.
निवडीसाठी सूचक आनंदा इंदुरकर व अनुमोदक प्रकाश कडव यांनी केले. यावेळी माजी उपसरपंच साधना माणगावकर, डी.एम. देसाई,दत्तात्रय कडव,महादेव मोरस्कर, महेश कांबळे, दशरथ मानगावकर, राहुल नलवडे, अनंत डोंगरकर, ग्रामसेवक सौ. बडगे ,रामचंद्र नाटले,सुरेश कांबळे, अमोल गुरव, भिकाजी सातपुते आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.