देवराष्ट्रेत झालेल्या ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सोहोली शाळेने मिळविला प्रथम क्रमांक आ. डॉ. विश्वजित कदम, आ. अरुण लाड यांची उपस्थिती

देवराष्ट्रेत झालेल्या ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सोहोली शाळेने मिळविला प्रथम क्रमांक
आ. डॉ. विश्वजित कदम, आ. अरुण लाड यांची उपस्थिती
सिंहवाणी ब्युरो / सोहोली / :
विदयार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आणि त्यांच्या नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यावर्षी देवराष्ट्रे येथील यशवंतराव हायस्कूल व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न झाले.
भारती विद्यापीठ पुणे संचालित लोकनेते मोहनराव कदम विद्यालय सोहोली शाळेने झालेल्या शिक्षण विभाग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये माध्यमिक
गटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
यामध्ये शाळेचे विद्यार्थी चि. शिवराज मोहिते चि. राज मोहिते यांनी सहभाग घेतला होता.
यामध्ये सोहोली विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. खिलारे सर मार्गदर्शक शिक्षिका सौ. सावंत मॅडम व श्री.मोमीन सर, श्री पुजारी सर, श्री आंबवडे सर, यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी कडेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, गटशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर चिमटे, शिक्षण विस्तार अधिकारी राजाक्का चव्हाण तसेच सोहोलीच्या लोकनियुक्त सरपंच कु. प्रणाली सूर्यवंशी यांनी विध्यार्थी व शाळेचे कौतुक केले.
