भुदरगड पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी भिकाजी खतकर तर सचिवपदी विजय चव्हाण

भुदरगड पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी भिकाजी खतकर तर सचिवपदी विजय चव्हाण
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
भुदरगड तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी भिकाजी शंकर खतकर नवरसवाडी तर सचिवपदी विजय राजाराम चव्हाण म्हासरंग यांची बिनविरोध निवड झाली. इंजूबाई मंदिर गारगोटी येथे ही निवड सभा झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा पोलीस पाटील संघाचे उपाध्यक्ष बाबाजी देसाई (अंतुर्ली ) हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय नागदिवे पोलीस पाटील यांनी केले तर प्रस्ताविक विजय चव्हाण यांनी केले शेवटी उपस्थित यांचे आभार जयवंत शिंदे पोलीस पाटील वेंगरूळ यांनी मांनले. निवडीनंतर आजरा भुदरगडचे उपविभागीय अधिकारी हरेश सूळ व भुदरगडचे पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. अन्य कार्यकारणी पुढील प्रमाने कार्याध्यक्ष रणजीत पुंडलिक पाटील उपाध्यक्ष शिवाजी पाटील भुदरगड पोलीस पाटील संघाची
नूतन कार्यकारणी
1श्री भिकाजी शंकर खतकर (अध्यक्ष)
2 श्री शिवाजी विठोबा पाटील (उपाध्यक्ष )
3 श्री विजय राजाराम चव्हाण( सचिव)
4 श्री रणजीत कुंडलिक पाटील (कार्याध्यक्ष )
5 श्री जयवंत बळवंत शिंदे (खजिनदार )
6 रायगोंडा श्रीपती पाटील (सदस्य )
7 धनाजी रामचंद्र महाजन( सदस्य )
8 उत्तम विष्णू माणगावकर (सदस्य )
9 विजयकुमार एकनाथ नागदिवे (सदस्य )
10 नामदेव राजाराम नलगे (सदस्य)
11 रोहिणी अरुण निढोरे (सदस्य )
12 माधुरी लक्ष्मण पाटील( सदस्य )
13 नानासो शंकर पाटील( सदस्य)
14 अशोक विष्णू जाधव( सदस्य )
15 हरिदास तुकाराम राणे (सदस्य)
