जिल्हाताज्या घडामोडी

अवघ्या चार तासात दोन अपघात …दोन मयत : मडिलगे परिसरात ट्रॅक्टर–टेंपोची धडक : चालकाचा मृत्यू, ्

अवघ्या चार तासात दोन अपघात …दोन मयत
मडिलगे परिसरात ट्रॅक्टर–टेंपोची धडक : चालकाचा मृत्यू, 

सिंहवाणी ब्युरो / मडीलगे :
मडिलगे खुर्द ता.भुदरगड येथील बस स्थानकाजवळ मंगळवारी रात्री साडे सातच्या सुमारास भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने येऊन टेम्पोने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत टेंपो चालकाचा जागीच मृत्यू झाला.संभाजी अप्पया नाईक (वय ३५,रा.जरळी,ता.गडहिंग्लज) असे त्या चालकाचे नाव आहे.या प्रकरणी ट्रॅक्टर चालक प्रकाश आश्राप्पा करवळ (रा.मडुर पैकी घावरेवाडी, ता.भुदरगड ) यांनी भुदरगड पोलिसांत फिर्याद दिली आहे.


घटनास्थळ आणि पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (दि.२)सायंकाळी साडेसातच्या सुमारास गारगोटीकडून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव टेंपोने (क्र.एमएच ०९ ईएल.१४५०)बिद्रीकडून गारगोटीकडे निघालेल्या ट्रॅक्टरला(क्र.एमएच ०९ जीएम ८२५४) समोरून जोराची धडक दिली.या धडकेत टेंपो ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये घुसला. अपघाताचा जोर इतका प्रचंड होता की टेंपोचे स्टेरिंग चालक संभाजी अप्पया नाईक यांच्या पोटात घुसले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्राथमिक धडकेनंतर अनियंत्रित झालेला टेंपो विरुद्ध दिशेला जाऊन गारगोटीच्या दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर जाऊन पुन्हा आदळला.यामध्ये एक ऊसतोड मजूर किरकोळ जखमी झाला.अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.


अवघ्या चार तासात दोन अपघात …दोन मयत
मडिलगे खुर्द बसस्थानकाजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या अपघातात एसटी बसच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला.तर या ठिकाणापासून शंभर मीटर अंतरावर अवघ्या चार तासांत दुसरा अपघात झाला.या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. मंगळवार हा या दोघांसाठी घातवार ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button