गोव्यात नाईट क्लबमधील सिलिंडरच्या स्फोटामुळे आग; 23 जणांचा मृत्यू : मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी : कठोर कारवाईचे आदेश

गोव्यात नाईट क्लबमधील सिलिंडरच्या स्फोटामुळे आग; 23 जणांचा मृत्यू :
मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनास्थळी : कठोर कारवाईचे आदेश
सिंहवाणी ब्युरो / म्हापसा
उत्तर गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी (6 नोव्हेंबर) रात्री उशिरा भीषण आग लागली. या घटनेत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी असून जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात सिलिंडरच्या स्फोटामुळे भीषण आग लागल्याचे दिसून येत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत घटनेची चौकशी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आणि दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले. दरम्यान, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकांनी रात्रभर बचावकार्य केले. धुराचे लोट आणि मोठ्या ज्वाळांमुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला, परंतु डझनभर लोकांना वेळेत बाहेर काढण्यात आले.
20 पुरुष आणि तीन महिलांचा मृत्यू
भाजप आमदार मायकल लोबो यांनी सांगितले की, या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात तीन महिला आणि 20 पुरुषांचा समावेश आहे. काही पर्यटक होते, तर बहुतेक स्थानिक लोक रेस्टॉरंटच्या तळघरात काम करत होते. गोव्यातील इतर सर्व क्लबचे सुरक्षा ऑडिट केले पाहिजे, जे अत्यंत महत्वाचे आहे. पर्यटक नेहमीच गोव्याला एक अतिशय सुरक्षित ठिकाण मानतात, परंतु आगीची घटना खूपच अस्वस्थ करणारी आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत. पर्यटकांची आणि या ठिकाणी काम करणाऱ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, असं मायकल लोबो म्हणाले.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, या घटनेत एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. गोवा सरकार सखोल चौकशी करेल आणि जबाबदार असलेल्यांना अटक करेल. पर्यटन स्तरावर अशी घटना गोव्याच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे