भुदरगड तालुका शेतकरी संघाचा कुर येथे व्यापारी संकुल उभारण्याचा संकल्प कौतुकास्पद : डॉ. आनंद महाराज गोसावी

भुदरगड तालुका शेतकरी संघाचा कुर येथे व्यापारी संकुल उभारण्याचा संकल्प कौतुकास्पद :
डॉ. आनंद महाराज गोसावी
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी :-
सहकार चळवळीमुळे आपल्या राज्याची प्रगती झाली असून सहकारी साखर कारखाने, सहकारी पतपुरवठा संस्था, शेतकरी संघ यामुळे राज्यातील अर्थकारणाला गती मिळाली आहे. भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाने सहकार चळवळ अधिक बळकट करून गाव पातळीवर सहकारी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी भुदरगड तालुका शेतकरी संघाचा कुर येथे
व्यापारी संकुल उभारण्याचा संकल्प कौतुकास्पद असे प्रतिपादन पुरातन श्रीहरी काका गोसावी भागवत मठाचे पीठाधीश डॉ. आनंद महाराज गोसावी यांनी केले.भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ लि. गारगोटी या संस्थेचे (कूर ता भुदरगड) येथील व्यापारी संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.प्रमुख उपस्थिती चेअरमन बाळ देसाई, व्हा चेअरमन शामराव देसाई होते.
चेअरमन प्रा बाळ देसाई म्हणाले
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून व्हावेत, यामाध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघांचे संचालक प्रा. एच. आर. पाटील यांनी केले. यावेळी कूरचे सरपंच मदन पाटील, पं .स . सदस्य मदन देसाई, सरपंच वसंतराव प्रभावळे, पी . एस . कांबळे सर ,उपसरपंच संदिप हळदकर ,बाजीराव राजिगरे, केरबा खाडे , आर .सी . पाटील,
संचालक विजयकुमार भांदीगरे ,मारुती पाटील , मानसिंग पाटील, नामदेव देसाई, प्रताप मेंगांने,शामराव इंदूलकर, बाजीराव देसाई, शहाजी देसाई ,नारायण पाटील अरुण बेलेकर, कॉम्रेड सम्राट आनंदराव मोरे, बाबूराव देसाई, शंकर पाटील, अनिल तळकर, संग्राम सावंत, अशोक यादव, बजरंग सुतार, प्रकाश कांबळे,बचारामगुरव,संघ व्यवस्थापक दत्तात्रय मांगोरे,संभाजी डेळेकर,संजय देसाई आदीं उपस्थित होते.आभार संचालक प्रा.विजय कोटकर यांनी मानले.
फोटो –
कूर येथे भुदरगड तालुका शेतकरी संघाचे व्यापारी संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी
डॉ. आनंद महाराज गोसावी सोबत मान्यवर