गडहिंग्लज बसस्थानकावर शिव सैनिकांचा राडा; कर्नाटक बसला फासले काळे!

गडहिंग्लज बसस्थानकावर शिव सैनिकांचा राडा; कर्नाटक बसला फासले काळे!
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज :
बेळगांव येथील कर्नाटक विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्र्वभूमीवर मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास विरोध करत आंदोलन दडपणाऱ्या व महामेळावा शांततेत पार पाडत असताना कर्नाटक पोलीसांच्या दडपशाही प्रवृत्तीच्या विरोधात गडहिंग्लज येथे उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी कर्नाटक बसला काळे फासून भगवे झेंडे फडकविले. जय महाराष्ट्र च्या घोषणा देत कर्नाटक शासनाचा तीव्र निषेध केला.

गडहिंग्लज बस स्थानकावर शिवसैनिक एकत्रित येत कर्नाटक बस अडवून काळे फासले. बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या.
प्रा शिंत्रे म्हणाले, आज बेळगाव येथे कर्नाटक पोलीस दडपशाही करीत अन्याय करीत आहेत. कर्नाटकच्या लोक प्रतिनिधी व मंत्र्यांना महाराष्ट्रात येवू देणार नाही असा इशारा देत शिंत्रे यांनी कन्नड सक्ती मराठी माणूस स्वीकारणार नाही असे स्पष्ट केले. यावेळी गडहिंग्लज तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.