महिलेला आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्या ‘ग्रंथ’ पालनकर्त्याचा ‘प्रताप’ ठळक चर्चेत! : नातेवाईकांनी जाब विचारत केली यथेच्छ धुलाई

महिलेला आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्या ‘ग्रंथ’ पालनकर्त्याचा ‘प्रताप’ ठळक चर्चेत!
नातेवाईकांनी जाब विचारत केली यथेच्छ धुलाई
सिंहवाणी ब्युरो / गडहिंग्लज
गडहिंग्लज शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेतील स्वभावाने ‘शांत’ असल्याचा आव आणत ‘ग्रंथ’ पालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांने एका महिला सहकाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज पाठवून त्रास दिल्याचा ‘प्रताप’ गडहिंग्लज उपविभागात चर्चेत सापडला आहे. त्या महिलेच्या नातेवाईकांनी जाब विचारत यथेच्छ धुलाई केल्याचा प्रकार घडल्याने त्याची उलट सुलट चर्चा सुरू आहे.
विनाअनुदान तत्वावर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला नोकरीत कायम करतो असे म्हणत रात्री अपरात्री आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्या ‘त्या’ ग्रंथ- पालकाच्या कृत्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही ‘त्या’ ग्रंथ पालकाने सहकारी महिलेला त्रास दिल्याने तिने नोकरी सोडली. पुन्हा एकदा ‘त्या’ ग्रंथ पालकाने आपला प्रताप दाखविल्याने संबंधित शिक्षण संस्था कारवाई करणार का? प्रत्येक शिक्षण संस्थेत महिला हक्क, संरक्षणाच्या दृष्टीने विशाखा समिती कार्यरत आहेत त्याद्वारे या प्रकरणाची चौकशी होणार का? अशी विचारणा होत आहे. या प्रकाराची गडहिंग्लज मध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.