जिल्हाताज्या घडामोडी

समाजातील नैतिक बुद्धिमत्तेचे दीपस्तंभ शिक्षकांनी बनावे : ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांचे मत

समाजातील नैतिक बुद्धिमत्तेचे दीपस्तंभ शिक्षकांनी बनावे

ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांचे मत

सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
आचार्य जावडेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालय मध्ये एक दिवशीय राष्ट्रीय परिसंवादामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये बोलताना ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत डॉक्टर सुभाष देसाई यांनी आचार्य जावडेकर पुण्यतिथी निमित्त बोलताना प्रथम जावडेकरना अभिवादन करून पन्नालाल सुराणा व बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली. ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले “समाजातील नैतिक बुद्धिमत्तेचे दीपस्तंभ शिक्षकांनी बनावे. संविधान हा केवळ ग्रंथ नसून भारतीयांच्या जगण्याची पद्धत आहे ही पुढच्या पिढीला समजावून सांगावे शिक्षक म्हणजे समाजातील बुद्धीचे रक्षकच आहेत “
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉक्टर प्रतिभा सदाशिव देसाई होत्या स्वागत आणि व्याख्यात्यांचा परिचय डॉक्टर आर के शेळके यांनी करून दिला तर सूत्रसंचालन श्रीमती एस आर बाड यांनी केले
डॉक्टर देसाई यांनी आपल्या भाषणात जागतिक आणि देशपातळीवरील राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी बद्दल ऐतिहासिक संदर्भासह माहिती सांगितली. त्यानंतर धर्म आणि विज्ञान एकमेकांच्या विरोधात आहेत का त्यांचा समन्वय होतो याविषयी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी समर्पक उत्तर दिले
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्या प्रतिभा देसाई म्हणाल्या शिक्षकांनी सामाजिक भान ठेवून पुढच्या पिढीला चांगले संस्कार देण्याच्या जबाबदारीच्या स्वीकार करावा आणि संविधानातील मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावीत”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button