क्राईमजिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहो.. कागल तालुक्यात विहीर चोरीला गेली❓ जुनी विहीरच नव्याने बांधली, माजी सरपंच, ग्राम सेवक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाख खाल्ले : मंडलिक गटाच्या आरोप

अहो.. कागल तालुक्यात विहीर चोरीला गेली❓


जुनी विहीरच नव्याने बांधली, माजी सरपंच, ग्राम सेवक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाख खाल्ले : मंडलिक गटाच्या आरोप

सिंहवाणी ब्युरो कागल:
लिंगनूर कापशी येथे जुन्या विहिरीला नवी दाखवून पाच लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा मंडलिक गटाचा आरोप. माजी सरपंच, ग्रामरोजगार सेवक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने मनरेगा निधी हडपल्याचा दावा.
: जुन्या विहिरीलाच नवीन विहीर दाखवून राज्य सरकारकडून पाच लाख उकळण्याचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील लिंगनूर कापशी इथे घडला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाच्या माजी सरपंचाने हा प्रकार केला असल्याचा आरोप मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. लिंगनूर (कापशी) गावातील माजी सरपंच राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस तालुका अध्यक्ष मयूर उर्फ राहल नेताजी आवळेकर याने आपल्या पदाचा गैरवापर करत हा प्रकार केला असल्याचा आरोप शिवसेना तालुका उपप्रमुख प्रमोद कुराडे यांनी केला आहे.
संबंधित माजी सरपंच मयूर आवळेकर याने शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी धनाजी जाधव याला हाताशी धरून संगनमताने आपल्या 2016 -17 ला काढलेल्या जुन्या विहिरीवर, ग्रामसभेमार्फत नव्या विहिरीचा प्रस्ताव जाणे अपेक्षित असताना सर्व नियम डावलून 8 मे 2025 रोजी कशाची मान्यता मिळवली? शिवाय एक दिवस अगोदर 7 मे 2025 रोजी जॉब कार्ड संबंधित लाभार्थ्यांनी काढले. एका दिवसात ग्रामसभेची परवानगी, दुसऱ्या दिवशी पंचायत समिती सदर प्रस्ताव मंजूर केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शासनाची फसवणूक करण्यासाठी शासकीय अधिकारी यांनी देखील कार्यतत्परता दाखवली. लाभ घेणारा मारजी सरपंच आवळेकर यांने विहीरीचा सातबारा उताऱ्यावर 2022-23 मध्ये नोंद घातली असून काम न करता रोजगार हमी (मनोरगा)मध्ये पैशाची उचल त्यांनी आपला भाऊ अमर आवळेकर आहे. जो ग्रामरोजगार सेवक असून खोटी कागदपत्रे रंगवून रोजगार हमी माणेरेगाचे पैसे हडप केल्या असल्याचा आरोप यावेळी कुऱ्हाडे यांनी केला आहे.
इतकेच नव्हे तर अमर आवळेकर यांनी आपल्या घरातील व्यक्तीचे प्रियंका आवळेकर तसे अनेक संबंधितांची खोटी जॉब कार्ड तयार केली आहे. सदरची विहीर ही शासन नियमान्सार सार्वजनिक भूजल स्वतःपासून 500 मीटरच्या जवळ असूनही हा नियम असताना देखील सदर विहिरीचा प्रस्ताव मान्य झालेला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली



, विरोधकांचे आरोप हे दिशाभूल करणारे आहेत. शासनाच्या नियमानुसारच आपण विहिरीचे काम केले आहे. निवडणूक तोंडावर आल्याने विरोधकांचे आरोप सुरू आहेत. लवकरच याबाबत मी भूमिका स्पष्ट करणार आहे. असे स्पष्टीकरण मयूर आवळेकर यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button