उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने गारगोटीत एड्स जनजागरण फेरी

उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने गारगोटीत एड्स जनजागरण फेरी
सिंहवाणी ब्युरो / गारगोटी
१ डिसेंबर जागतिक एड्स दिन पार पडला ,त्याला अनुसरून १ते १५ तारखे पर्यंत विविध कार्यक्रमाचे नियोजन करून उपजिल्हा रुग्णालय गारगोटीने सामाजिक बांधिलकी पार पाडली.
त्यामध्ये विविध शाळा महाविद्यालये या ठिकाणी जाऊन विध्यार्थी वर्गाचे एच. आय. व्ही ./एड्स बाबत रुग्णालयाचे आय.सी.टी.सी.समुपदेशक जयवंत सावंत व जयश्री पाटील (प्रा. शा .तंत्रज्ञ )यांनी संवेदिकरण केले. श्रीमती वत्सलाताई डी.पाटील महाविद्यालय गारगोटी यांच्या संयुक्त विध्यामाने एच. आय. व्ही ./एड्स जनजागरण फेरी काढण्यात आली यामध्ये ११० मुलीनी सहभाग घेतला होता . प्रसंगी बोलताना उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.पल्लवी तारलकर यांनी महाविद्यालयाच्या विध्यार्थाना एच. आय. व्ही वर काळजी हाच उपाय हा मुलभूत मंत्र दिला .त्याच बरोबर सावंत यांनी मुलांना एच. आय. व्ही ची कारणे ,लक्षणे व त्यावरचे उपाय याबाबत अवगत केले
या प्रसंगी उपस्थित असलेल्या विध्यार्थी तसेच महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे व उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे समुपदेशक जयवंत सावंत यांनी आभार मानले
